सोमवारी कॉर्टर येथील बंद असलेले आरोग्य केंद्र सुरू करा – शिवसेनेची मागणी

नागपूर :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे व पूर्व विदर्भनेते किरण पांडव, पुर्व विभागीय नेत्या मनीषा कायंदे, जिल्हाप्रमुख सुरज गोजे यांच्या मार्गदर्शनात सोमवारी कॉर्टर येथील आरोग्य केंद्र गेल्या ३० वर्षापासून बंद स्थितीमध्ये असून या केंद्राचा उपयोग जेष्ठ नागरिक, महिला, लहान बालके यांच्याकरिता व्हावा यासाठी वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांना जिल्हा प्रमुख मनीषा पापडकर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. प्रभाग ३१ मध्ये सोमवारी कॉर्टर म्हाडा वसाहतीत गेल्या 30 ते 40 वर्षापासून बाल आरोग्य केंद्र बंद आहे, अनेक दिवसापासून येथील स्थानिक नागरिकांच्या तक्रार प्राप्त झाल्या, आरोग्य केंद्र बंद असल्याकारणाने येथे कचरा साठलेला आहे. तसेच साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर सुद्धा विपरीत परिणाम होत असल्यामुळे येथील स्थानिक नागरिक अत्यंत वैतागलेले आहे, मृत जनावर सुद्धा याठीकाणी आणून टाकतात त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे, राज्य सरकारच्या योजने अंतर्गत येथील आरोग्य केंद्र मध्ये आपला दवाखाना सुरू करून ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले यांना आरोग्य सुविधा देण्यात याव्या व शासनाच्या इमारतीचा योग्य वापर होऊन गरोदर स्त्रिया यांनासुद्धा आपल्या आरोग्य केंद्र अंतर्गत लाभ मिळावा या संबंधित निवेदन दिले.

तसेच या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट संबंधित अधिकाऱ्याकडून करून आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरू करून नागरिकांना आरोग्याचा लाभ देण्यात यावा तसेच इमारती संबंधित सर्व कागदपत्रे सादर करण्यात आली.नागरिकांना आरोग्य संबंधित होणाऱ्या त्रासाबद्दल निवारण करावे तसेच शासनाला सुद्धा या संबंधित पत्रव्यवहार करून लवकरात लवकर हा विषय मार्गी लावण्या संबंधित चर्चा केली. यावेळी जिल्हा प्रमुख मनीषा पापडकर, शहर प्रमुख समीर शिंदे, शहर प्रमुख धीरज फंदी, युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश तिघरे, माजी नगरसेवक गणेश डोईफोडे, रोहित कटरे, सलमान खान, रीशी तोमस्कर, गायत्री वैद्य, मनीषा पराड, मीनल शितोळे, पूनम चाडगे, पुनम हरवडे, शिल्पा थोटे, प्रवीण अहिरकर, मीना जालेकर, सव्वालाखे, महेश तोमस्कर समस्त वस्तीतील नागरिक व शिवसैनिक उपस्थित होते.

NewsToday24x7

Next Post

ठाकरे गटाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी भाजपामध्ये

Thu Feb 1 , 2024
दापोली :- मंडणगड मतदारसंघाचे सलग 25 वर्षे प्रतिनिधीत्व केलेले उबाठा गटातील माजी आमदार सूर्यकांत दळवी, दापोली पंचायत समितीचे माजी सभापती शांताराम पवार ,राष्ट्रवादी चे नेते व रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे माजी संचालक प्रकाश शिगवण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी गुरुवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com