NEW DILHI :-The Prime Minister, Narendra Modi has expressed sorrow over the accident of noted cricketer, Rishabh Pant. The Prime Minister tweeted; “Distressed by the accident of noted cricketer Rishabh Pant. I pray for his good health and well-being. @RishabhPant17”
Top News
NEW DILHI :-As part of the ongoing efforts of the Coal Ministry to develop Eco-Parks on reclaimed land and to promote mine tourism eight eco-parks have been constructed recently in different parts of the country and two more such parks will be completed in 2022-23. Union Minister of Coal, Mines & Parliamentary Affairs Pralhad Joshi has inaugurated Jhurey/Bal Gangadhar Tilak […]
मुंबई : देशांतर्गत स्थलांतरण करणाऱ्या स्थलांतरित मतदारांसाठी दूरस्थ मतप्रणाली राबविण्याची निवडणूक आयोगामार्फत तयारी करण्यात येत आहे. यामुळे स्थलांतर करणाऱ्या मतदाराने मतदान करण्यासाठी आपल्या गृह राज्यात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. याबाबतच्या कायदेशीर, परीचालानात्मक, प्रशासकीय व तंत्रज्ञान विषयक आव्हानांबाबत भारतीय निवडणूक आयोगाने संकल्पना दस्तऐवज तयार केला असून सदर दस्तैवजावर आयोगाने राजकीय पक्षांचे अभिप्राय मागविले आहेत.भारत निवडणूक आयोगाचे संयुक्त संचालक (माध्यमे) अनुज चांडक […]
नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अर्थसंकल्पिय अधिवेशन 27 फेब्रुवारी 2023 रोजी विधानभवन, मुंबई येथे होणार असल्याची घोषणा उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत तसेच अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली.
· गुन्ह्यातील दोषसिद्धतेचे प्रमाण आज 60 टक्के · नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना 6195 कोटी · परकीय थेट गुंतवणुकीत वर्षअखेर महाराष्ट्र अव्वल नागपूर : कापसाची खरेदी हमी भावापेक्षा कमी होत असेल तर शासन त्यात मध्यस्थी करून आवश्यकता पडल्यास अधिकची केंद्रे तयार करेल. कुठल्याही परिस्थितीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत 259 अन्वये […]
विदर्भ, मराठवाड्याच्या हिताचे अनेक निर्णय नागपूर : कोरोना संकट कालावधीनंतर नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन झाले. या अधिवेशनात 12 विधेयके मंजूर करण्यात आली. त्याचबरोबर धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार रुपयांचा बोनस थेट त्यांच्या खात्यावर देण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय इतर विविध निर्णयांच्या माध्यमातून विदर्भाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. अधिवेशनात अनेक […]
नागपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री दिवंगत हिराबेन दामोदरदास मोदी यांना आज विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. सभागृहाच्यावतीने अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर यांनी शोकसंदेश वाचून दाखविला. शोकसंदेशात ॲड. नार्वेकर म्हणाले, हिराबेन मोदी यांनी नुकतीच आपल्या वयाची शंभर वर्ष पूर्ण केली होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आईंचा मोठा प्रभाव आहे. त्यांनी तसे एका मुलाखतीत बोलून दाखविले होते. आपल्या आईने जीवनात […]
नागपूर : राज्य राखीव पोलीस बलाचे केंद्र जळगाव जिल्ह्यातील वरणगाव किंवा आणि अहमदनगर जिल्ह्यातील कुसडगाव येथे सुरू करण्याबाबत संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यासोबत जानेवारी महिन्यात बैठक घेऊन मार्ग काढला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य रोहित पवार यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र […]
नागपूर : पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांच्या पाठीशी शासन आहे. मत्स्य व्यवसाय विभाग हा रोजगार क्षमता असणारा विभाग असून या विभाला गती देण्यात येईल, अशी माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. पर्ससीन मासेमारीवर बंदी असतानाही अनेक मच्छीमार बेकायदेशीररित्या मासेमारी करीत असल्याबाबत प्रश्न वैभव नाईक यांनी उपस्थित केला होता. मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, 120 हॉर्सवर स्पीड बोटीला परवानगी दिली आहे. 720 […]
नागपूर :- मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास आता शक्य होणार आहे. पुनर्विकास नियमातील फेरबदल सूचना काढल्यामुळे आता लाखो लोकांच्या इमारतींशी संबधीत प्रलंबीत विषय यामुळे मार्गी लागला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली. म्हाडाने पुनर्बांधणी केलेल्या ३८९ इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे. धोकादायक किंवा किमान ३० वर्ष जुन्या इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन मालकी तत्वावर ३०० […]
मंत्रालयात बोगस भरतीप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल;वरिष्ठांच्या भूमिकेची चौकशी करुन कडक कारवाई करणार;विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मागणीनंतर उपमुख्यमंत्र्यांची घोषणा नागपूर, दि. ३० डिसेंबर – मंत्रालयात ‘क’ संवर्गातील लिपिकवर्गीय पदांची भरती सुरु असल्याचे खोटे सांगून मंत्रालयातील शिपाई पदावरील काही कर्मचाऱ्यांनी बोगस भरतीप्रक्रिया राबवली. या कर्मचाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवांच्या दालनात उमेदवारांच्या बोगस मुलाखतींचे नाटक घडवून आणले. यातून अनेक युवकांची लाखो रुपयांची […]
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मागणीनंतर उपमुख्यमंत्र्यांची घोषणा नागपूर, दि. ३० डिसेंबर – उच्च न्यायालयाकडून अनुदानाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना असतानाही ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि राष्ट्रसेवा दलाचे नेते पन्नालाल सुराणा यांच्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील ‘आपले घर’ या अनाथालयाला अनुदान देण्यात टाळाटाळ करण्यात येत आहे. संस्थेच्या किराणा बिलात त्रुटी, आधारकार्ड नाही यासारखी कारणे दाखवून दिरंगाई केली जात आहे. बदललेल्या […]
नागपूर, दि. 30 : आदिवासी समाजातील युवक आणि युवतींना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती होण्याची गरज आहे. नवचेतना स्वयंदीप आत्मनिर्भरता कक्षाच्या माध्यमातून ही गरज पूर्णत्वास येणार आहे. अत्यंत कौतुकास्पद अशी ही कक्ष संकल्पना राज्यभर राबविण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी आज येथे सांगितले. नवचेतना स्वयंदीप आत्मनिर्भरता कक्षाचे उदघाटन आज आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात […]
नागपूर, दि. ३० डिसेंबर – महाराष्ट्रविरोधी कुरघाड्या कर्नाटक सरकारने आता महाराष्ट्राचे पाणी पळविण्याच्या प्रयत्न सुरु केला असून यामुळे राज्याचा पाणीहिस्सा आणि पर्यावरणाला ही धोका निर्माण होणार असल्याची बाब विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत पॉईँट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून राज्य सरकारच्या लक्षात आणून दिली. महाजन आयोगानुसार खानापूर तालुक्यातील ३० गावांचा समावेश महाराष्ट्रात करण्याची शिफारस आहे. कळसा भांडुरा प्रकल्पामुळे गोव्याबरोबरच […]
राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना मागणीचे पत्र नागपूर : राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत सापडला आहे. योग्य हमीभाव देऊन आणि निर्यात धोरणात योग्य तो बदल करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मागण्यांचे पत्र केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पाठविले आहे. हमीभाव वाढवण्याची गरज राज्यात सोयाबीन आणि […]
नागपूर : राज्यात कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे विविध विभागांतर्गत पदभरतीस बंदी होती. यामध्ये शिथिलता आल्याने राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर रिक्त पदे भरण्यासाठी फेब्रुवारी २०२३ मध्ये मुलाखती घेऊन मार्चमध्ये नेमणुका दिल्या जातील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली. राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी भरती अभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याबद्दल सदस्य किरण सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री […]
नागपूर : मराठी भाषेचे संवर्धन व जगभर प्रसार व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे आणि सांस्कृतिक कार्य व उद्योग विभागाच्या सहकार्याने दि. ०४, ०५ व ०६ जानेवारी २०२३ रोजी नॅशनल स्पोर्टस् स्टेडियम, वरळी, मुंबई येथे मराठी विश्व संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील सर्व खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी यांनी सदर कार्यक्रमाच्या तीनही दिवशी सहभागी व्हावे, अशी विनंती विधान सभा […]
मुख्यमंत्र्यांनी मांडला विदर्भाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा भरीव तरतुदींसह विविध घोषणा • धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजार रुपये बोनस • राज्यासाठी आकांक्षित तालुका कार्यक्रम • वस्त्रोद्योगासाठी नवे धोरण • समतोल प्रादेशिक विकासासाठी नागपूर : विदर्भाच्या विकासाशिवाय महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास पूर्ण होऊ शकत नाही हे सांगतांना धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
नागपूर : विदर्भातील शेतकऱ्यांना नवीन कृषीपंप आणि विद्युत जोडणी देण्याचे काम प्राधान्याने सुरु आहे. यात पहिल्या टप्प्यात पैसे भरून प्रलंबित असलेल्या जोडण्या मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विदर्भातील शेतकऱ्यांना कृषीपंप मिळण्यास विलंब होत असल्याबाबत सदस्य प्रवीण दटके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री […]
नागपूर : इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम अपेक्षित वेळेपेक्षा कमी कालावधीत झाले पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रत्यक्ष भेट देऊन एक कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला आहे. त्यामुळे हे स्मारक अपेक्षित वेळेपेक्षा कमी कालावधीत पूर्ण केले जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात दिली. विधानपरिषद सदस्य […]