नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शुक्रवारी (16) रोजी शोध पथकाने 155 प्रकरणांची नोंद करून 62300 रुपयाचा दंड वसूल केला. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- राष्ट्रीय सेवा योजना श्रीमती किशोरीताई भोयर काॅलेज ऑफ फार्मसी कामठी तसेच ग्रामीण रूग्णालय कामठी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सिकलसेल सप्ताह ११ ते १७ डिसेंबर अंतर्गत दि. १५/१२/२०२२ ला कामठी फार्मसी महाविद्यालयात सिकलसेल तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सिकलसेल जनजागृतीच्या उद्देशाने आयोजित शिबिरात ग्रामीण रूग्णालय कामठी येथील डॉ शबनम व त्यांच्या चमूने २५० […]

नागपूर :- भिवापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत व्यवसाय शिल्प निदेशकाचे फळे भाज्या संस्करण एक पद तासिका तत्वावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार असून त्यासाठी शासकीय दराने मानधन देण्यात येणार आहे. व्यवसाय शिल्प निदेशकासाठी संबंधित व्यवसायातील द्वितीय श्रेणीमध्ये पदविका उत्तीर्ण असल्यास अनुभवाची आवश्यकता नाही. संबंधित व्यवसायातील नॅशनल अप्रेटिस सर्टिफिकेट किंवा नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट किंवा महाराष्ट्राचे एस.सी.व्ही.टी. सर्टिफिकेट असल्यास प्रशिक्षणासह चार […]

नागपूर : ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकासह पशुपालक व शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत, त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. जिल्ह्यातील पशुपालक शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले […]

नागपूर :- महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर हे रविवार, 18 डिसेंबरला नागपूर येथे येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे आहे. दुपारी 3 वाजता नागपूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने कुटीर क्रमांक 9, रवी भवनकडे प्रयाण करतील. त्यानंतर रवीभवन येथून मोटारीने विधानभवनकडे प्रयाण करतील.दुपारी 4 वाजता सोमवार, 19 डिसेंबरपासून नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासंदर्भात आढावा बैठकीस उपस्थित राहतील. त्यानंतर विधानभवन […]

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने पठाणपुरा गेट बाहेर उघड्यावर कचरा टाकलेल्या संबंधीत कॅटरर्स कडुन ५००० रुपयांचा दंड तर रस्त्यावर बांधकाम साहीत्य ठेवणाऱ्या ४ नागरिकांकडुन ६००० रुपयांचा दंड वसुल केला आहे. संबंधीतांकडुन दंड वसुल करून पुन्हा सदर कृती न करण्याची ताकीद देण्यात आली आहे. वास्तविकतः दंड ठोठावणे नाही तर स्वच्छतेचे पालन व्हावे हा यामागचा हेतू आहे. स्वच्छता विभागामार्फत दररोज […]

मुंबई :-राज्यपालांच्या सचिवालयाच्या नवीन इमारतीचे उदघाटन आज (शुक्रवार, दि. १६) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन, मुंबई येथे करण्यात आले. मुख्यमंत्र्यांकडून देखील सचिवालयाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दौऱ्यावर जाणार असल्यामुळे त्यांनी सकाळीच राजभवन येथे जाऊन राज्यपालांसह नव्या सचिवालय इमारतीची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांसोबत बंदरे व खाणकाम मंत्री दादाजी भुसे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर […]

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात कळसूत्रीकार मीना नाईक यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या 22 केंद्रावरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून सोमवार दिनांक 19, मंगळवार 20 व बुधवार 21 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून समजप्रबोधन करणाऱ्या, समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या […]

मुंबई :- कान्हेरी लेण्यांचे अप्रतिम सौंदर्य, नीरव शांतता आणि निसर्गरम्य परिसर पाहून जी- 20 देशांचे प्रतिनिधीं भारावले. जी-20 देशांच्या प्रतिनिधींची 13 ते 16 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये मुंबईत परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या शेवटच्या दिवशी जी-20 प्रतिनिधींसाठी मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील प्रसिद्ध कान्हेरी लेण्यांना भेट देवून या स्थळांची माहिती व इतिहास जाणून घेतला.बोरीवली जवळील साष्टी बेटाच्या […]

चंद्रपूर मनपातर्फे ” भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सव “ चंद्रपूर  :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे २३ डिसेंबर ते २६ डिसेंबर दरम्यान राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन यात भाग घेण्यास आता अंतिम ४ दिवस शिल्लक राहीले आहेत. चंद्रपूर शहराचे सुशोभीकरण व सौंदर्यीकरण स्पर्धात्मक रीतीने होऊन कलाकृतीचे नवीन रंग शहरवासीयांना अनुभवता यावे या दृष्टीने आयुक्त विपीन पालीवाल यांच्या संकल्पनेतुन स्पर्धेचे आयोजन करण्यात […]

· जिल्ह्यामध्ये धान भरडाईची गती वाढणार भंडारा : किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत जिल्ह्यामध्ये माहे नोव्हेंबर 2022 पासून धान खरेदीची सुरुवात झाली आहे. 15 डिसेंबर 2022 अखेर सुमारे 21 लक्ष क्विंटल किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदी झाली आहे. पुरेशी धान खरेदी झाल्याने जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील समितीने खरीप पणन हंगाम 2022-23 करिता धान भरडाईला मंजुरी दिली असून 15 […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 16 :- येत्या 18 डिसेंबर ला होऊ घातलेल्या कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायत निवडणुकीत थेट जनतेतून निवड होणाऱ्या 27 सरपंच पदासाठी 90 उमेदवार तर 27 ग्रा प च्या 93 प्रभागातील 247 सदस्य पदासाठी 620 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.आज 16 डिसेंबर ला सायंकाळी साडे पाच वाजता प्रचारतोफा थंडावल्या असून उद्या 17 डिसेंबर ही दिवसा छुपा […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 16 :- गावाचा विकास हाच एक ध्यास या विचारसरनेतून ग्रा प निवडणुकीत भाजप प्रणित उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.केंद्रात व राज्यात भाजप ची सत्ता असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन डिजिटल इंडियाची सुरुवात झाली आहे.तेव्हा गावाच्या विकासासाठी ग्रा प निवडणुकीत भाजप प्रणित उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन माजी मंत्री व विधांनपरिषद सदस्य […]

· परसोडी व शिवनीबांधला भेट · दूध संकलन केंद्राची व बारदाना निर्मितीची पाहणी भंडारा :- महिला आर्थिक विकास महामंडळच्या कामांची पाहणी करण्यासाठी काल जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी साकोली तालुक्यातील परसोडी दुध संकलन केंद्र व शिवनीबांध बारदाना निर्मिती केंद्राचा पाहणी दौरा केला. परसोडी येथील गंगोत्री दूध संकलन केंद्राला भेट दिली. जिल्ह्यात बचत गटांना नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्योग विकास प्रकल्प अंतर्गत […]

सांगली :- राज्यपाल व भाजपचे लोक महापुरुषांबाबत अनुउद्गार काढत आहेत. राज्यातील मंत्री खालच्या पातळीवर बोलून महापुरुषांच्या कार्याचा अपमान करत आहेत. आज महाराष्ट्रात प्रचंड बेरोजगारी आहे. यावर तोडगा न काढता बेरोजगारीवर अधिक भर घालण्याचे काम राज्यातील शिंदे टोळी आणि भाजपचे सरकार करत आहे त्यामुळेच उद्याचा महाविकास आघाडीचा महामोर्चा हा सरकारला धडकी भरवणारा असेल असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 16 :- एकविसाव्या शतकात मानवाने अनेक क्षेत्रात क्रांती केली आहे .आजच्या हायटेक आणि धकाधकीच्या संगणकीय युगात शहरापासून अगदी खेड्यापर्यंत इंटरनेटचे जाळे पसरले आहे इंटरनेटच्या माध्यमातून चांगली माहिती मिळते हे खरे आहे सोबतच इंटरनेटच्या माध्यमातून इ सेक्स बिजनेस सुरु झाल्याने आजची तरुणाई हि ई सेक्स च्या जाळ्यात अडकली आहे यातून सायबर क्राईम सोबतच समाजविघातक […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी येथे आशा दिवस उत्साहात साजरा कामठी :- शासनाच्या आरोग्यविषयक प्रत्येक योजनांची माहिती व लाभ आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचविणाऱ्या तसेच गरोदर मातेची वेळोवेळी आरोग्य तपासणी व नवजात शिशुचे संगोपन नियमित करण्याचे पुण्यकार्य आशा वर्कर वर्षाचे 365 ही दिवस अव्याहतपणे करीत असून अत्यंत कमी मोबदल्यावर काम करणाऱ्या या आशा सेविकांचे करावे तेवढे कौतुक कमी असून आशा […]

• काल १ लाख २१ हजार ५०८ नागरिकांनी मेट्रोने केला प्रवास नागपूर :- मेट्रोच्या कामठी मार्ग व सेंट्रल एव्हेन्यू मार्गिकेचे लोकार्पण झाल्यानंतर प्रवासी सेवे मध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. काल दिनांक १४ डिसेंबर रोजी १ लाख २१ हजार ५०८ नागरिकांनी मेट्रोने प्रवास केला. उल्लेखनीय आहे कि, लोकार्पण झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी रात्री दहा वाजेपर्यंत मेट्रोने आणखी एक मैलाचा दगड पार करीत […]

अमित शहांची शिष्टाई कामाला येणार; मुख्यमंत्र्यांनी समोपचाराने घ्यावे मुंबई :-केवळ राजकारणामुळे महाराष्ट्र-कर्नाटकचा सीमावाद तापवला जातोय.भाषेच्या मुद्दयावरून दोन्ही राज्यातील नारिकांच्या भावना भडकावत त्याचा राजकीय फायदा करून घेण्याचा मानस काही राजकीय पक्षांचा आहे.हे लक्षात येताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीमावादात शिष्टाई करीत दोन्ही राज्यांना, या राज्यातील विरोधी पक्षांना शांतता राखत घटनात्मक मार्गाने तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. असे असतानांही गुरूवारी बेळगाव […]

गडचिरोली : सद्य:परिस्थितीत ढगाळ वातावरण असल्यामुळे हरभरा पिकावरील घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच आंधारीरात्र असल्यामुळे घाटेअळीचे पतंग मोठ्या प्रमाणावर अंडे देऊ शकतात. या सर्व बाबी घाटेअळीस पोषक असल्यामुळे सध्या घाटेअळीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होऊ शकतो. बऱ्याच ठिकाणी या अळीने प्रादुर्भाव करण्यास सुरुवात केली आहे. हि कीड बहुभक्षी असून विशेषतः पिक फुलोरा आणि प्रामुख्याने घाटे अवस्थेत नुकसानकारक असते. लहान अळ्या […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com