लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायद्याबाबत जनजागृती नागपूर :-  बालकांचे हित व त्यांचे अधिकारांबाबत उचित तरतूदी कायद्यामध्ये दिलेल्या आहेत. बालकांचे लैंगिक शोषण व लैंगिक दुरुपयोग अपराध असून अपराध करणाऱ्यांवर कडक कारवाई आपश्यक आहे. त्यानुषंगाने कायद्याची निर्मिती करण्यात आली असल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर जयदिप पांडे यांनी सांगितले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने सेवासदन सक्षम हायस्कुल बर्डी, […]

नागपूर :- लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघात कुटुंबप्रमुख म्हणूनच काम करुन मतदारसंघातील नागरिकांना आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी यासारख्या मुलभूत नागरी सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणे गरजचे असल्याचे प्रतिपादन संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात ‘लोकप्रतिनिधींची स्वत:च्या मतदारसंघाविषयी कर्तव्ये आणि विकासकामांचे नियोजन’ या विषयावर संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मार्गदर्शन केले, त्यावेळी ते […]

नागपूर :- अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या आधारे शासकीय सेवेत दाखल झालेल्या आणि त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या उमेदवारांना अधिसंख्य पदावर कायम ठेवले आहे. यामध्ये आदिवासी उमेदवारावर कोणताही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊन त्यांना त्वरित न्याय मिळावा म्हणून रिक्तपदे भरतीसाठी कालबद्ध पद्धतीने भरतीप्रक्रिया तातडीने राबवणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली. अनुसूचित जमाती प्रवर्गातील जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या उमेदवारांना […]

नागपूर :- युवकांनी जनसामान्यांच्या मुलभूत समस्या घेऊन चळवळ उभी करावी, या चळवळीतूनच जनसामान्यांच्या मुलभूत समस्या सोडविण्यासाठी मदत होत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले. राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात आज ‘संसदीय कार्यप्रणाली व लोकशाही संवर्धनासाठी युवक चळवळींचे योगदान” या विषयावर आमदार प्रणिती शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार महादेव जानकर, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव […]

नागपूर :- नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा शेतमाल सुरक्षित राहावा म्हणून बाजार समितीकडून अद्ययावत अग्निशमन योजनेसाठी सात कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प प्रस्तावित आहे, असे राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी पणन विभागाच्यावतीने उत्तर देताना आज विधानसभेत सांगितले. विधानसभेत आज सदस्य कृष्णा खोपडे यांनी नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीबाबत लक्ष वेधले होते. त्यावेळी मंत्री भुसे बोलत होते. त्यांनी […]

नागपूर :- राज्यातील २० किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा कोणताही निर्णय शासनस्तरावर घेण्यात आलेला नाही, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसेच, लवकरच शिक्षक आणि शिक्षकेतर पद भरतीची प्रक्रिया वित्त विभागाच्या मान्यतेनंतर सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. विधानसभा सदस्य अमित देशमुख यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री दीपक […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी   कामठी तालुका वार्तापत्र  कामठी ता प्र 22 :- बिडी मजदूरांचे हृदय सम्राट ऍड ना.ह.कुंभारे उपाख्य दादासाहेब कुंभारे यांचा बिडी मजदूरांच्या सर्वांगीण विकासासाठी लढा देत असताना 14 ऑक्टोबर 1982 ला गोंदिया शहरात सकाळी 6 वाजता प्रवासाने जात असताना वाटेतच त्यांचा हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले होते तसेच कन्हान नदिच्या पैलतिरी विद्रोहाचे पाणी पेटवणारे जयभीम प्रवर्तक […]

 ‘म्युझिकल फाऊंटन’ शो चे विशेष आयोजन  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘म्युझिकल फाऊंटन शो’ च्या माध्यमातून नागपुरचा ऐतिहासिक आलेख जगासमोर येणार आहे. धकाधकीच्या आयुष्यात हा शो विरंगुळा देत, आयुष्यातून ताणतणाव घालवून आनंद देईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. नागपूर महानगर प्रदेश विकास […]

मोतीराम रहाटे, प्रतिनिधी  कन्हान (नागपुर) : – पोलीस स्टेशन अंतर्गत प्रगती नगर सुपर टाऊन कन्हान कन्हान येथे अवैधरित्या तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी धुमाकुळ घालत फिरणारा आरो पी जिगर कनोजिया यास स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथक पोलीसांनी पकडुन त्यांच्या जवळुन तलवा र जप्त करून पोस्टे कन्हान ला त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाहीस कन्हान पोली साच्या ताब्यात देण्यात आले […]

मनपा व अग्रेसर फाउंडेशनचा उपक्रम : श्रीनिवास रामानुजन यांना अभिवादन नागपूर :- थोर गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिनाच्या अनुषंगाने नागपूर शहरातील सुमारे ८ हजार विद्यार्थ्यांनी एकाचवेळी सामुहिक पाढे वाचन केले. नागपूर महानगरपालिका आणि अग्रेसर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय गणित दिनानिमित्त ‘बे एके बे’ हे सामुहिक पाढे वाचनाचे आयोजन गुरूवारी २२ डिसेंबर रोजी महाल येथील चिटणीस पार्क […]

राज्यसरकारच्या या हुकुमशाही कृतीचा जयंत पाटील यांनी केला निषेध… नागपूर  :- मला निलंबित केलात तरी राज्यातील तरुणांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, महिलांच्या प्रश्नांसाठी मी लढतच राहणार असल्याचे सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यसरकारच्या या हुकुमशाही कृतीचा निषेध केला. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विरोधकांचा वारंवार आवाज दाबण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकारकडून होत […]

– प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अर्पण केली श्रद्धांजली नागपूर :- पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार व पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांच्या निधनाने भारतीय जनता पार्टीने कर्तबगार व निष्ठावंत लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशी श्रद्धांजली भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अर्पण केली. ते म्हणाले की, मुक्ता टिळक यांनी नगरसेवक, महापौर आणि आमदार म्हणून सक्षमपणे लोकसेवा केली. शहरातील राजकीय, सांस्कृतिक व […]

नागपूर :- राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असताना, या भागातील संत्री पिकावर ‘कोळशी’ या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. विदर्भात अधिवेशन सुरू असताना या भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळेल का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला. विदर्भातील नागपूर आणि अमरावती जिल्हा संत्र्यासाठी प्रसिद्ध आहेत. संबंधित मंत्र्यांनी दिलेले उत्तर हे समाधानकारक मिळालेले […]

नागपूर :- आमदार निवासस्थानात गैरसोयीचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देताना टॉयलेटच्या शेजारी कपबशा धुवत असल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला असल्याचे सांगितले. हे काय चाललंय आहे असा संतप्त सवाल करतानाच संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करा आणि ठेकेदाराला काळ्या यादीत टाका अशी मागणी केली. दरम्यान पोलीसांनाही जेवण दिले गेले नाही सरकारचे लक्ष नाही सरकारचे लक्ष आहे कुठे असा सवाल […]

मोतीराम रहाटे, प्रतिनिधी कन्हान (नागपुर) : – पोलीस स्टेशन अंतर्गत खंडाळा शिवार राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ नागपुर बॉयपास रोडवर कन्हान नदी पुला जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका इसमाचा मृत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी पोस्टे ला अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. प्राप्त माहिती नुसार मंगळवार (दि.१९) डिसेंबर ला पोलीस हवालदार जयलाल सहारे हे पोस्टे कन्हानला […]

संदीप बलविर,प्रतिनिधी –पोलीस निरीक्षक भीमाजी पाटील मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन नागपूर :- महाराष्ट्रातील अठरा पगड जातींना एकत्र करून स्वराज्याचे तोरण बांधणारे,मराठी माणसाची अस्मिता जागृत करणारे,महाराष्ट्राचे आराध्य दैवत महापराक्रमी,शूरवीर,छत्रपती शिवाजी महाराज तसेच सत्यशोधक,क्रांतिसूर्य,राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले,कर्मवीर भाऊराव पाटील व विश्वरत्न, संविधानकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विरोधात आक्षेपहार्य विधान करणारे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी व महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण […]

विधानसभा अध्यक्ष सरकारला पाठीशी घालत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षाचा सभात्याग नागपूर  :- आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी भाजप सरकारच्या कालावधीत विधीमंडळातील सदस्यांसह अनेक मान्यवरांचे फोन बेकायदेशीरपणे टॅपिंग केले. यामुळे विधीमंडळाच्या सदस्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच झाला असून लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. या फोन टॅपिंग प्रकरणाचा मास्टर माईंड कोण आहे ? कोणाच्या आदेशाने हे फोन टॅपिंग करण्यात आले ? आता रश्मी […]

गडचिरोली : गडचिरोली जिल्हयातील धनगर समाजाच्या नवउद्योजक महिलांना सुचित करण्यात येते की,केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजातील महिलांकरीताच्या सवलतीस पात्र नवउद्योजक महिला लाभार्थ्यांना एकुण प्रकल्प किंमतीच्या लाभार्थी यांचे हिस्यामधील 25 टक्के मधील जास्तीत जास्त 15 टक्के मर्जिन मनी उपलब्ध करुन देण्यास ( Front End Subsidy ) देण्यास इतर मागासवर्ग सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग,विमुक्त जाती,भटक्या […]

 – जल्लोषात निघाली विजयी रॅली बेला :- बेला येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जि. प.सदस्य वंदना बालपांडे यांचे यजमान अरुण देवराव बालपांडे यांचा सरपंचपदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार असतानाही दणदणीत विजय झाला. त्यांच्या गटाचे 17 पैकी 12 सदस्य सुद्धा निवडून आले. एकतर्फी व घवघवीत यशामुळे बालपांडे यांचे समर्थकांनी गावात जल्लोषात रॅली काढून उत्साहात भव्य स्वागत केले. बेला येथे सरपंचपदासाठी 10 उमेदवार रिंगणात होते. […]

नागपूर :- विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु असून आज अतिरिक्त मुख्य सचिव मुख्यमंत्री सचिवालय व नगरविकास विभाग (१) भूषण गगराणी यांनी झिरो माईल फ्रिडम पार्क – एयरपोर्ट साऊथ – सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन पर्यंत मेट्रोने प्रवास केला. महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी गगराणी यांचे स्वागत करत झिरो माईल फ्रिडम मेट्रो स्टेशन येथील सपनों से बेहत्तर प्रदर्शन […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com