स्व.इदिरा गांधी उच्च प्राथ.माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय निमखेडा येथे वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव संपन्न 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी: स्व. इंदिरा गांधी उच्च प्राथ. माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय निमखेडा ता. मौदा शाळेत वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन दिनांक 25/ 01/2023 रोज बुधवारला करण्यात आले होते प्रसंगी महोत्सवाच्या उद्घाटक म्हणून मुक्ता विष्णू कोकड्डे (जिल्हा परिषद अध्यक्षा नागपुर) व अध्यक्ष म्हणून रक्षा खांडेकर (सहसचिव शाळा व्यवस्थापन समिती) तसेच प्रमुख अतिथी म्हणून सुनीता श्रीनुजी यागंटी (सरपंच निमखेडा), मनोज झाडे (उपसरपंच निमखेडा) डॉक्टर प्रसाद गोखले (सचिव कवी कालिदास युनिव्हर्सिटी रामटेक) , विनायक घाटबांदे, राहुल बोरकर, उमेश शेंडे , बाल्याभाऊ खेरगडे ,ताराचंद मंगतानी असुराज महिले, सुरेश ज्ञानचंदानी,रामेश्वर भक्तवर्ती (केंद्रप्रमुख निमखेडा), दिलीप कपाळे ,डॉ बिरादार , पातूरी ( मुख्याध्यापिका विश्रांती कॉन्व्हेन्ट) हे मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे आगमन होताच आमच्या शाळेतील मुलींनी लेझीम ढोल ताशाच्या गजरात त्यांचे स्वागत केले महोत्सवात शाळेच्या वतीने कोकड्डे यांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका शांता खांडेकर यांनी त्यांच्या विशेष सत्कार केला तसेच इतर मान्यवरांच्या सुद्धा सत्कार करण्यात आला शाळेतील विद्यार्थ्यांनी दर्शनी नृत्य सादर केले यावर कोकड्डे  यांनी विद्यार्थ्यांना पालक वर्गाला तसेच गावकरी यांना मार्गदर्शन केले मुख्याध्यापिका शांता खांडेकर अलका वासनिक, तेजस्विनी खांडेकर, उके , यांनी कोकाटे यांच्या आगमना प्रत्यर्थ आभार मानले आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी सुद्धा महोत्सवातील नृत्यांना प्रोत्साहन दिले व कार्यक्रमाच्या आस्वाद घेतला कार्यक्रमाचे संचालन बुजाडे , हटवार यांनी केले तर आभार जांबुळे यांनी मानले महोत्सवात शाळेतील शिक्षक  महेश गिरी, संदीप जुमनाके ,संदीप बावनकर ,देवचंद भोवते , डाखोडे मॅडम , वाकोडकर, मेश्राम , पानतावणे, गणवीर  नागपूरे , राजकुमार भिवगडे , भिवगडे, विनोद टांगले, गणेश बरवैया व मोठ्या संख्येने पालक वर्ग गावकरी उपस्थित होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com