मुंबई :- इचलकरंजी शहरासाठी पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासंदर्भात तज्ञांची समिती नेमून एक महिन्यात अहवाल देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. इचलकरंजी शहरासाठी सुळकुड उद्भव पाणीपुरवठा योजनेसंदर्भात आज विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, […]

पुणे :- जिल्हा प्रशासन, समाजकल्याण विभाग व पुणे जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथी व्यक्तींसाठी आयोजित करण्यात आलेल्या मतदान जनजागृती रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या हस्ते भिडेवाडा येथे करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी तृतीयपंथी व्यक्तींनी मुख्य प्रवाहात येवून मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभाग घेण्याचे आवाहन केले. पुणे जिल्ह्यात प्रथमच तृतीयपंथी व्यक्तींसाठी मतदार […]

– केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आयएमसी-वायएलएफ युवा परिषद 2024 मध्ये युवा वर्गाला केले संबोधित मुंबई :- केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयएमसी – युवा नेते मंचाच्या (IMC-YLF) चौथ्या युवा परिषदेचे उद्घाटन केले. देश स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे अनुराग सिंग ठाकूर यांनी उद्घाटन सत्रादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना […]

नवी दिल्‍ली :- केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज फेडरल बँकेच्या 2024 च्या वार्षिक सरकारी आणि संस्थात्मक व्यवसाय संमेलनाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संबोधित करताना, मंत्र्यांनी प्रारंभीच फेडरल बँकेच्या सर्वकालीन उच्च समभाग मूल्यांबद्दल अभिनंदन केले. याआधीच्या काळात सत्तेवर असलेल्या सरकारची आठवण करून देताना ठाकूर म्हणाले की, 2014 पूर्वीचे सरकार ‘धोरण लकवा’ साठी ओळखले जात होते. 2014 […]

नवी दिल्‍ली :- मुलामुलींना आणि तरुणांना अवकाश आणि विश्वाबद्दल आकर्षण असते. ते खूप जिज्ञासू आहेत आणि त्यांची सर्व खगोलीय घटनांबद्दल सर्वकाही जाणून घेण्याची इच्छा आहे. तरुण मनांच्या या उत्कट कुतूहलाला योग्य मार्गदर्शन देण्यासाठी, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शालेय मुलांसाठी “यंग सायंटिस्ट प्रोग्राम” अर्थात “युवा वैज्ञानिक कार्यक्रम” (युविका) या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे तरुण […]

– महाराष्ट्राकडे आर्थिक आव्हानांना तोंड देण्याची ताकद – सर्व उपाययोजनांद्वारे आर्थिक आव्हानांवर मात करणार – ज्योतिबा देवस्थान प्राधिकरण स्थापन करण्यात येणार – असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा – दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपयांच्या अनुदानासाठी पुरवणी मागणी, पुनर्विनियोजनाद्वारे निधी उपलब्ध करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत आश्वासन मुंबई :- राज्याची आर्थिक स्थिती चांगली असून आर्थिक आव्हानांना तोंड देण्याची […]

नागपूर :- विश्वस्त मंडळाचा ठराव क्र. ६/९५१/२८.१०.९९/का.अ./विटाभट्टी च्या अनुषंगाने मौजा भरतवाडा व पुणापूर येथील कुभारांना/विट्टा भट्टी धारकांना पालकमंत्री, याचे निर्देशानुसार सन १९९९ ला भूखंड परवान्यावर वाटप करण्याच्या दृष्टीने स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात देवून अर्ज मागविण्यात आले होते व सदर ठरावाच्या अनुषंगाने भूखंड वार्षिक परवान्यावर देण्यात आलेले होते, त्यापैकी १०४ भूखंड धारकांना सदर भूखंडके तात्पुरत्या परवान्यावर वाटप करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या […]

नागपूर :- पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत राहणाऱ्या ३३ वर्षीय महिला फिर्यादी यांचा परिचित आरोपी नामे अभिषेक यशवंत सुर्यवंशी, वय ३१ वर्षे, रा. हिंगणा, नागपूर याने फिर्यादी महीलेचा वाढदिवस साजरा करण्याचे बहाण्याने फिर्यादी महीलेला त्याचे घरी घेवुन गेला व फिर्यादीस शरीरसुखाची मागणी करू लागल्याने फिर्यादीने नकार दिला असता, आरोपीने तिचे ईच्छेविरुध्द शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर आरोपीने फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखवुन […]

नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क १ वे अधिकारी व अंमलदार हे रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे शोधात पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्‌दीत पेट्रोलीग करीत असताना, त्यांना उदयनगर चौक येथे सार्वजनिक ठिकाणी एक संशयीत ईसम दिसला असता, तो पोलीसांना पाहुन पळून जात असता, त्यास स्टाफने मदतीने ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव हर्षल राकेश ब्राम्हणे, वय २४ वर्षे, रा. पॉट नं. […]

नागपूर :- पोलीस ठाणे कळमना हद्दीत प्लॉट नं. २०१, कटरे सोसायटी, गुलमोहर नगर, कळमना, नागपुर येथे राहणाऱ्या फिर्यादी पल्लवी प्रफुल्ल वानखेडे, वय २८ वर्षे, यांचेसोबत राहणारी मैत्रीण आरोपी नामे रूपाली रमेश बोरपाटे, वय ३० वर्षे, रा. तमकुही राज, कुशीनगर (उत्तर प्रदेश) हिने फिर्यादीची नजर चुकऊन, त्यांचे पर्समधुन कपाटाची चाबी घेवुन, कपाटातील सोन्याचे वेगवेगळे प्रकारचे दागिने व नगदी ४०,०००/- रु. असा […]

नागपूर :- ७२ व्या अखिल भारतीय पोलीस वॉलिबॉल क्लस्टर स्पर्धेचा उद्‌घाटन सोहळा दि. २९.०२.२०२४ रोजी दुपारी ०४.०० वा. नागपूर शहर पोलीस मुख्यालय येथील शिवाजी स्टेडियमवर थाटामाटात पार पडला, या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या महणून महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक   रश्मी शुक्ला उपस्थित होत्या. कार्यक्रमास उपस्थितांमध्ये  पोलीस आयुक्त, नागपूर शहर डॉ. रविंद्र कुमार सिंगल,आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग शिरीश जैन, सह पोलीस आयुक्त, नागपूर […]

नागपुर :- पोलीस आयुक्त नागपुर शहर हे दिनांक २९.०२.२०२४ चे १७. ३० वा. नागपुर पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित पोलीस भवन येथील ऑडीटोरीयम हॉल येथे सेवानिवृत्त होणारे पोलीस अधिकारी, अंमलदार तथा सफाई कामगार यांचे निरोप समारंभ कार्यकमाकरीता स्वतः आवर्जुन उपस्थित राहीले. सेवानिवृत्त होणारे १३ अधिकारी आणि अंमलदार तसेच सफाई कामगार यांना सह पत्नी परीवारासह पोलीस आयुक्त यांनी भावपुर्ण निरोप दिला. याक्षणी पोलीस […]

नागपूर :- सर्वसामान्य जनतेला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन आपल्या दारी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांर्तगत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मतदारसंघ असणाऱ्या दक्षिण-पश्चिम नागपूरातील रामदासपेठ येथील मेजर आनंद खरे लेंड्रापार्क येथे गुरुवारी (ता२९) शासन आपल्या दारी विशेष शिबिराचे उदघाटन करण्यात आले. नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा एकाच छताखाली लाभ घ्यावा तसेच शिबिराला मोठ्या संख्येत भेट द्यावी […]

मुंबई :- महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भरणाऱ्या यात्रा-जत्रांना भाविकांच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. या तीर्थक्षेत्रांना वर्षभर भेटी देणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील “ब” वर्ग तीर्थक्षेत्रांच्या परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने निधीची मर्यादा २ कोटी रुपयांवरून ५ कोटी रुपये इतकी वाढविली आहे. राज्यातील आध्यात्मिक क्षेत्राच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतल्याबद्दल अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय […]

पुणे :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात पिंपरी-चिंचवड शहरातील तिन्ही विधानसभा मतदार संघातील महिला मतदारांचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टिकोनातून महिलांना ईव्हीएमचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच चिंचवड विधानसभा मतदार संघामार्फत महिलांना मार्गदर्शन करण्यात येऊन महिलांना मतदान करण्याची शपथ देण्यात आली. या उपक्रमात मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत असलेल्या तिन्ही विधानसभा मतदार संघानी सहभाग घेतला. कुटुंबातील […]

पुणे :- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून सारथी संस्थेमार्फत सरदार हिरोजी इंदलकर सारथी किल्ले संवर्धन उपक्रमाअंतर्गत राज्यातील ४७ गड किल्यांवर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर व मान्यवरांच्या उपस्थित लाल महाल येथे छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन सरदार हिरोजी इंदलकर सारथी किल्ले संवर्धन उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. स्वच्छता मोहिमेत संस्थेचे […]

यवतमाळ :- आद्य क्रांतीविर राजे उमाजी नाईक प्रमाणपत्र अभियान अंतर्गत जात वैधता प्रमाणपत्र विशेष मोहिम दिनांक 26 फेब्रवारी ते 11 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. त्याअंतर्गत या कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने त्रुती पुर्तता शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अभियानांतर्गत दि.1 मार्च, दि.7 मार्च व दि.12 मार्च रोजी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॅा.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय […]

यवतमाळ :- यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनाथ बालकांसाठी ५ मार्चपर्यंत अनाथ पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रभाकर उपरे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा बाल संरक्षण कक्षामध्ये समर्पित कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये अनाथ मुलांना राज्य शासनाच्या विविध सवलतीचा लाभ घेता यावा व अनाथ प्रमाणपत्र काढण्यासाठी मदत केली जाणार आहे. एक […]

नागपूर :-भारताचे झिरो माईल अशी ओळख असलेले व भारताच्या मध्यभागी वसलेल्या नागपूर शहराची पालकसंस्था नागपूर महानगरपालिकेला शनिवार २ मार्च २०२४ रोजी ७३ वर्षे पूर्ण होत आहेत. “पौर जन हिताय” या ब्रीद वाक्याला निरंतर जपणारी नागपूर महानगरपालिका नागरिकांच्या अविरत सेवेत तत्पर आहे. मनपाच्या ७३ वा स्थापना दिनानिमित मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी समस्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. मनपाचा […]

मुंबई :- ऊसतोड कामगारांच्या मुलांचा शिक्षण आणि आरोग्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. याबाबत जिल्हा पातळीवर होणाऱ्या कार्यवाही संदर्भात तातडीने बैठक घेऊन आढावा घेण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी या समस्यांबाबत लवकरच आढावा घेणार असल्याचे सांगितले. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या साखरशाळा आणि आरोग्य याविषयी बुधवारी विधान परिषदेत पुरवण्या मागण्यांवर चर्चेदरम्यान सदस्य सुरेश […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com