मुंबई :- सातारा जिल्ह्यात जलपर्यटनासाठी भरपूर वाव आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटन विभागातर्फे जिल्ह्यात वॉटर स्पोर्ट्स अकॅडमी लवकरात लवकर साकारण्याचा मानस असल्याची माहिती पर्यटन, खनीकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. मंत्रालयातील दालनात पर्यटन विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी पर्यटन विभागाचे संचालक बी. एन. पाटील, व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी, अधीक्षक अभियंता बोरसे आणि इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते. […]

मुंबई :- पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी एकात्मिक मानव दर्शन तत्त्वज्ञान मांडले. यांच्या या विचारांमध्ये समाजाच्या आणि देशाच्या विकासाची आणि पर्यायाने मानवजातीच्या कल्याणाची बिजे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. धर्मवीर संभाजी महाराज सागरी किनारा मार्गावरील भुलाबाई देसाई मार्ग येथील चौकाचे पंडित दीनदयाळ उपाध्याय चौक नामकरण व लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पंडित […]

– येत्या 15 दिवसांत भाजपाचे आणखी 50 लाख सदस्य नोंदविण्याचे लक्ष्य मुंबई :- संघटन पर्वाअंतर्गत महाराष्ट्र भाजपाने 1 कोटी सदस्य नोंदणीचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. येत्या 15 दिवसांत आणखी 50 लाख सदस्य नोंदवून दीड कोटी सदस्य नोंदणीचे लक्ष्य साध्य केले जाईल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी व्यक्त केला. यासाठी आपण 13 फेब्रुवारीपासून कार्यकारी अध्यक्ष रवींद्र […]

– शाळा विकासासाठी शिक्षक महत्तवाचा घटक : आयुक्त – शिक्षणोत्सव २०२४-२५चा थाटात समारोप  नागपूर :- विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण असतात अशा सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या शिक्षणोत्सवाचा पंधरवाडा हा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी अत्यंत महत्वाचा ठरला असल्याचे प्रतिपादन शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी केले. नागपूर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने रेशिमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सोमवारी (ता. १० […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या आवंढी गावातील कृषक शेती भाग परिसरात मागील काही महिन्यांपासून अनधिकृतपणे कोळसा टॉल सुरू असून या कोळसा टॉल मध्ये बऱ्याच ठिकाणाहून आलेला दगडी कोळसा साठवला जातो त्यानंतर ट्रक द्वारे या कोळसा ची आदाण प्रदान केली जाते यात कोळशाच्या अतिरेकी वापरामुळे लगतच्या परिसरात कोळशाचा धूर आणि आणि बारीक काळीक पसरल्याने वातावरण काळभोर कोळसामय […]

नागपूर :- ‘एकात्म मानव दर्शन’ अंत्योदयचे प्रणेते पंडीत दीनदयाल यांच्या पुण्यतिथी निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले. मनपा मुख्यालयातील दालनात पं.दीनदयाल उपाध्याय यांच्या तैलचित्राला मनपा अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी उपायुक्त विजय देशमुख, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, जनसंपर्क अधिकारी  मनीष सोनी, कार्यकारी अभियंता राजेश गुरमुळे, अमोल […]

– अध्यक्षपदी अरुण पाचकवडे तर सचिवपदी विजय गोगटे – महिला अध्यक्षपदी शैला तळोकर तर ज्येष्ठांच्या अध्यक्षपदी सुरेश लोंदे – आमसभेत सर्वानुमते निर्णय यवतमाळ :- अखिल माळवी सोनार संघाची सर्वसाधारण आमसभा रविवार, ९ फेब्रुवारी रोजी स्थानिक गेडाम नगरातील संदीपमंगलम येथे बहुसंख्य समाजबांधवांच्या उपस्थितीत पार पडली. प्रथमच याप्रसंगी तब्बल तीन कार्यकारिणींची जाहिररित्या निवड सर्वानुमते करण्यात आली. अखिल माळवी सोनार संघ (र.नं. महा. […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कन्हान :- पारशिवनी तालुक्यातील न्यू गोंडेगाव येथील मारोतराव लसुंते यांचा निवासस्थानी दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा समर्थ सद्गुरु संत भाकरे बाबा यांच्या १०४ व्या जयंती महोत्सव दोन दिवसीय कार्यक्रमाने थाटात साजरी करण्यात आली. शनिवार (दि.८) फेब्रुवारी ला सकाळी ११ वाजता संत भाकरे बाबा यांच्या प्रतिमेचे पुजन व कलश स्थापनाने दोन दिवसीय महोत्सवाचा शुभारंभ करण्या त आला. […]

– तीन आरोपींना अटक 81 हजारांचा मुद्दे माल जप्त – शेत मालकाचे शोधत पोलीस कोंढाळी :- काटोल तालुक्यातील कोंढाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येथून पाच कि मि अंतरावरील नांदोरा येथील पोल्ट्री फार्म उप्तादका चे शेतात पोल्ट्री फार्म ‌लगत आजूबाजूला गांजाच्या शेतीचा प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी कोंढाळी चे‌ ठाणेदार राजकुमार त्रिपाठी यांनी १०फरवरी चे रात्री शोधसत्र दरम्यान पोल्ट्री फार्म उभारण्यात आलेल्या शेतात […]

– दोन सखख्या भावासह, तीन युवकांचा मृत्यू  – कार चालवणे शिकताना घडली दुर्दैवी घटना – बुटीबोरी पोलीस स्टेशन अंतर्गत बालभारती मैदानाजवळील घटना  नागपूर :- नुकतीच नवीन खरेदी केलेली कार शिकण्यासाठी म्हणून दोन सख्खे भाऊ आणि त्यांचा मित्र कार क्र.एम एच ०३ ए डब्ल्यू ४५०० घेऊन बुटीबोरी येथील बालभारती मैदानावर गेले.त्या मैदानावर कार चालवीत दोन तीन चक्कर काढल्या… अन घराकडे परत […]

उतावळा नवरा गुढग्याला बाशिंग, अशी आजच्या उथळ चंचल बहुतांश मीडियाची अवस्था आहे किंवा उचलली जीभ लावली टाळूला हि म्हण देखील त्यांनाच लागू पडते, आजची उथळ मीडिया लिहून बोलून मोकळी होते खरी पण त्या दिशाहीन लिहिण्या बोलण्याचे क्षणिक वाईट परिणाम जरी सत्ताधाऱ्यांना भोगावे लागत असले तरी दूरगामी वाईट परिणाम स्वतः मीडियावर होताहेत नेमकी तीच वस्तुस्थिती आहे म्हणजे केवळ 15 दिवसांपूर्वी फक्त […]

मुंबई :- जपानचे लोक परिश्रमी, प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ असून जपानची कार्य संस्कृती जगात सर्वोत्तम आहे. हिरोशिमा व नागासाकी शहरे बेचिराख झाल्यानंतर ज्या निर्धाराने जपान नव्या उमेदीने उभा ठाकला, ते अतिशय कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी काढले. जपानचे सम्राट नारुहितो यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील जपानच्या वाणिज्य दूतावासातर्फे सोमवारी (दि.१०) हॉटेल ताजमहाल, मुंबई येथे एका स्वागत समारंभाचे आयोजन […]

– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान नवी दिल्ली :- महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्राप्त होणे हे माझे सौभाग्य असल्याचे मी समजतो असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. येथील महाराष्ट्र सदनात अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ‘महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार’ सोहळयाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी शिंदे बोलत होते. एकनाथ शिंदे […]

मुंबई :- ‘महालक्ष्मी सरस’ हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम झाला आहे. राज्यभरातील बचत गटांना हक्काचे विक्रीचा साधन उपलब्ध व्हावे यासाठी प्रायोगिक तत्त्वावर दहा जिल्ह्यात दहा मॉल तयार करणार. टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात उमेद मॉल तयार करणार आहोत. त्याचं बरोबर राज्यात आगामी कालावधीत एक कोटी लखपती दीदी करण्याचा संकल्प आहे. सध्या राज्यात १८ लाख लखपती दीदी असून मार्चपर्यंत पंचवीस लाख लखपती दीदी करणार […]

मुंबई :- मे.ग्लोबल मीटर मॅन्युफॅक्चरींग कंपनी, पुणे यांनी उत्पादीत केलेल्या ऑटोरिक्षा/टॅक्सी मीटर त्यांना केंद्र शासनाने मंजूर केलेल्या नमुन्यामध्ये (मॉडेल अप्रुव्हल) ग्राहकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने काही फेरबदल केल्याची याचिका मुंबई उच्च न्यायालय येथे दाखल होती. या याचिकेवर दि.३१/०१/२०२५ रोजी सुनावणी होऊन मे. ग्लोबल मीटर मॅन्युफॅक्चरींग कंपनी, पुणे यांनी उत्पादीत केलेल्या ऑटोरिक्षा/टॅक्सी मीटर (Model Approval No.-IND/०९/०६/१६३) ची विक्री व वितरण पुढील आदेशापर्यंत […]

अरोली :- धर्मापुरी येथे हनुमान देवस्थान पंचकमिटीच्या भव्य पटांगणावर मागील सहा फेब्रुवारी गुरुवारपासून कथावाचक ह भ प अर्जुन महाराज गिरडकर (आळंदीकर) यांच्या वाणीतून त्यांच्या चमूंच्या सहकार्याने संगीतमय हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा सोहळा सुरू असून, त्याच्या समारोप आज 12 फेब्रुवारी बुधवारला दुपारी तीन वाजता पासून भव्य महाप्रसादाने होणार असून, लाभ घेण्याचे आव्हान हनुमान देवस्थान पंचकमिटी यांनी केले आहे.

अरोली :- पिपरी (खंडाळा) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री हनुमान मंदिर देवस्थान पिंपरी खंडाळा च्या भव्य पटांगणावर संगीतमय शिव महापुराण व हरिनाम सप्ताहाचे आयोजन मागील 5 फेब्रुवारी बुधवारपासून प्रवचनकर्ता व्यासपीठाचार्य मारोडी येथील ह भ प कैलासराव वाघाये महाराज यांच्या वाणीतून त्यांच्या संपूर्ण चमूंच्या सहकार्याने सुरू आहे. त्याच्या समारोप आज 12 फेब्रुवारी बुधवारला दुपारी दोन वाजता पासून भव्य महाप्रसादाने होणार असून लाभ […]

अरोली :- खात – रेवराल जिल्हा परिषद क्षेत्रातील गट ग्रामपंचायत आदासा अंतर्गत येणाऱ्या शिवनी (खात) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही नवयुवक सांस्कृतिक मंडळ शिवनी तर्फे तीन दिवसीय जलस्याची सुरुवात उद्या दिनांक 12 फेब्रुवारी बुधवारपासून गोपालकाल्याने होणार आहे. गोपालकाल्याचे किर्तन आंभोरा येथील सुखदेवराव कुरकुडे महाराज करणार आहेत. 11 फेब्रुवारी मंगळवारपासून जागृतीने कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. 13 फेब्रुवारी गुरुवारला सकाळी दहा वाजता पासून शाहीर […]

मुंबई :- युनायटेड वे मुंबई या सामाजिक संस्थेच्या “प्रोजेक्ट सक्षम” या मुख्य उपक्रमाअंतर्गत महिलांना व्यावसायिक कौशल्ये व उद्योजकीय संधी उपलब्ध करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यात येते. या उपक्रमाअंतर्गत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते गरजु महिलांना उद्योगपूरक संसाधनांचे वाटप करण्यात येणार आहे. बँक ऑफ बडोदाच्या औद्योगिक सामाजिक बांधिलकी अंतर्गत युनायटेड वे मुंबई सोबत करार करण्यात आला आहे. या […]

मुंबई :- कोकणात आंबा पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने ठोस उपाययोजना कराव्यात अशा सूचना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. फुलकिड नियंत्रणाबाबत कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या दालनात बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. फुलकिडीमुळे होत असलेल्या नुकसानीविषयी परिस्थिती कृषी मंत्री कोकाटे यांच्या […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!