गडचिरोली :- अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा गडचिरोली जिल्ह्यातील दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि.05 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10.30 वा. राजवाडा निवासस्थान, अहेरी येथून इंदारामकडे मोटारीने प्रयाण. सकाळी 11 वाजता इंदराम येथे आगमन व कार्यकर्ता मेळावा. दुपारी 2 वाजता तिरूपती मडावी इंदाराम यांचे निवासस्थानी राखीव. दुपारी 3 वाजता इंदाराम येथून अहेरीकडे मोटारीने प्रयाण. दुपारी 03.30 वा. […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्व नागपूरातील विविध कामांचे लोकार्पण रविवार 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांच्या हस्ते व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा नवीन पारडी पोलिस स्टेशन, पुनापूर पारडी पूर्व नागपुर येथे […]

Nagpur :- Kshitij Shweta-Vinay Channe has bagged Bronze Medal in 100M Breast Stroke Swimming event in 16th State Level Para Swimming Championship 2024-25 held at Mumbai recently. The Swimming competition was organised by Paraolympic Sports Association (Maharashtra). Kshitij is 9th standard student of PratapNagar Vidyalaya, Nagpur. Kshitij gives credit of his victory to Mr Bhojraj Meshram from NIT Swimming Pool, […]

यवतमाळ :- जिल्हास्तरीय लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित केला जातो. या महिन्याचा लोकशाही दिन सोमवार दि. 7 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन (बचत भवन) येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे, असे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

यवतमाळ :- महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी उपाध्यक्ष श्यामराव काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाली. पणन महासंघ ही महाराष्ट्रातील खरेदी- विक्री व पणन संस्थांनी शिखर संस्था असून राज्यातील 827 अ वर्ग सहकारी संस्था पणन महासंघाचे सभासद आहेत. संस्थेने आजवरच्या काळात शेती व शेतकरी आणि ग्राहक […]

यवतमाळ :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची अंमलबजावणी सुरु आहे. जिल्ह्यात आजपर्यंत दोन टप्प्यात ६ लाख ९२ हजार ९८७ इतक्या महिला लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. लाभार्थ्यांना बॅंकेमार्फत लाभ दिला जात असल्याने बॅक खाते आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे. ज्यांचे प्रमाणिकरण बाकी असेल त्यांनी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत प्रतिमाह 1 हजार 500 याप्रमाणे पात्र महिलांना लाभ […]

नागपूर :- दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे 68 व्या धम्मचक्र प्रर्वतनदिन कार्यक्रमाच्या निमित्ताने येणाऱ्या अनुयायींच्या योग्य सुरक्षा, आरोग्य व इतर सेवांबाबत सर्व यंत्रणांनी एकमेकांच्या सहकार्याने जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. वैद्यकीय पथक, सुरक्षा पथक, स्वच्छता पथक, वाहतूक व्यवस्था, अतिरिक्त निवास व्यवस्था या ठिकाणी ज्या अधिकारी, कर्मचारी वर्गावर जबाबदारी देण्यात आली आहे त्यांनी अधिक काळजी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन […]

– आदिवासी बहुल गावाच्या विकासात पडणार भर – पुसद प्रकल्पातील १४७ गावांमध्ये राबणार अभियान यवतमाळ :- देशातील आदिवासी जमातीच्या आर्थिक व सामाजिक विकासाकरीता प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान ही योजना राबविण्यात येत आहे. या अभियानाद्वारे संपूर्ण देशभरातील ३० राज्य व केंद्रशासित प्रदेशातील ५४९ जिल्ह्यांमधील २ हजार ७४० तालुक्यातील ६३ हजार ८४३ आदिवासीबहुल गावांचा विकास साधला जाणार आहे. पुसद आदिवासी प्रकल्पातील […]

नागपूर :- राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम दि. 7 ऑक्टोबर रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नागपूर दौरा पुढीलप्रमाणे असणार आहे. दि. 7 ऑक्टोबर रोजी रविभवन येथे आगमन. सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल गुन्हयांचा जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त नागपूर, प्रादेशिक उपआयुक्त व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर यांचे सोबत रविभवन येथे आढावा व […]

– वर्धमाननगरातील एच.जी. इंडस्ट्रीवर मनपाचा छापा नागपूर :- राज्यात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी असताना सुद्धा नागपुरात सर्रास कॅरी बॅगचे उत्पादन करणाऱ्या लकडगंज झोन अंतर्गत वर्धमाननगर स्थित एच.जी. इंडस्ट्रीज फॅक्टरीवर नागपूर महानगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभागाने छापा टाकून जप्ती कारवाई केली, शुक्रवारी (ता: ४ ) रोजी करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान ५८९ किलो प्रतिबंधित प्लास्टिक, कॅरीबॅग्स, खर्रा पन्नी ज्याची किंमत अंदाजे ७० हजार […]

नागपूर :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. हा निर्णय समस्त मराठी जनांना सुखावणारा असून खऱ्या अर्थानं अभिजात साहित्याचा ठेवा ज्यांनी तयार केला, अशा सगळ्यांचं हे श्रेय आहे अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी विविध क्षेत्रातील […]

– माहिती आयोगाच्या नागपूर खंडपिठात ऑनलाईन सुनावणी प्रणालीचे उद्घाटन नागपूर :- ऑनलाईन सुनावणी प्रणालीमुळे सुदूर भागातील नागरिकांना तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना सुनावणीसाठी सोयीचे ठरणार असून जलद न्याय प्रक्रियेसाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाच्या वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी आज येथे केले. सिव्हिल लाईन परिसरातील राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपिठाच्या ऑनलाईन सुनावणी प्रणालीचे उद्घाटन न्या. डांगरे यांच्या हस्ते […]

– मनपास्तरीय समितीची बैठक संपन्न चंद्रपूर :- मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ३९३५ लाभार्थ्यांच्या अर्जांना मनपा सभागृहात आयुक्त विपीन पालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मनपास्तरीय समिती बैठकीत मंजुरी देण्यात आली. वयोश्री योजनेसाठी आतापर्यंत ५०६२ अर्ज प्राप्त झाले होते, यापैकी ११२७ अर्ज वयाची अट पूर्ण न करत असल्याने तसेच कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याकारणाने अपात्र ठरले आहेत. योजनेसाठी समाज कल्याण कार्यालय व चंद्रपूर महानगरपालिकैची सर्व […]

– ढोल ताशांचा गजरात भक्तिमय वातावरणात मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत  – मुंबई विभागातील ८०० भाविक अयोध्येकडे रवाना मुंबई :- ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शनासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ योजना’ सुरु करण्यात आली आहे. तीर्थयात्रा अध्यात्मिक मानसिक समाधानाची बाब आहे. कोल्हापूर, जळगाव नंतर तीर्थदर्शनासाठी तिसरी ट्रेन मुंबईतून आज रवाना होत आहे. योजनेअंतर्गत सर्व जिल्ह्यातून तीर्थ दर्शनासाठी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक जाण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे तीर्थक्षेत्र […]

महसूल विभाग राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ राज्यातील अकृषिक कर आकारणीचा जनतेवर पडत असलेला बोजा पूर्णपणे काढण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या गावातील गावठाणांमध्ये असणाऱ्या जमिनीवरील अकृषिक कर कायमस्वरुपी माफ आहे. मात्र गावठाणाबाहेर रहिवासी घरांची संख्या वाढत असल्याने आणि शहरी भागात बहुमजली इमारती वाढत असल्याने अशा इमारतींखालील जमिनींचा संपूर्ण अकृषिक कर […]

– ‘बंजारा विरासत’ नंगारा म्युझियमचे लोकार्पण व सभा – लाखो बंजारा बांधव उपस्थित राहणार यवतमाळ :- बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या शनिवारी ५ ऑक्टोबर रोजी येत आहेत. सकाळी १० वाजता संरक्षण दलाच्या हेलिकॉप्टरने त्यांचे पोहरादेवी येथे आगमन होणार आहे. येथे पोहोचल्यानंतर ते संत सेवालाल महाराज, धर्मगुरू रामरावबापू महाराज यांच्या समाधीचे आणि जंगदबा […]

– केंद्र, राज्य सरकारच्या कामांच्या बळावर महायुती विजयी होणार  – माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचा विश्वास मुंबई :- विधानसभा निवडणूकीसाठी प्रदेश भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन केली असून केंद्र आणि राज्य सरकारची अव्वल कामगीरी, पक्ष संघटनेच्या प्रभावी व्यवस्थापनाच्या बळावर आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्याचा निर्धार भारतीय जनता पार्टीने केला आहे, अशी माहिती निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष […]

कोदामेंढी :- शासनाच्या ई – ग्रामस्वराज या पोर्टलवर येथील ग्रामपंचायतीला मागील आर्थिक वर्ष 2023 – 24 मध्ये पंधरावा वित्त आयोगअंतर्गत 40,56,198 प्राप्त झाले आहे. त्यापैकी आतापर्यंत एकूण फक्त17,54,547 रुपये खर्च झाल्याचे नमुद आहे. मागील आर्थिक वर्षाचे 23,01,651 रुपये ग्रामपंचायतीकडे शिल्लक असताना पंधरावा वित्त आयोग अंतर्गत चालू वर्ष 2024-25 मध्ये ग्रामपंचायत मध्ये आलेल्या 34,01,790 रुपयांपैकी 1,10,000 (water way construction labourer payment) […]

नवी मुंबई :- कोकण विभागीय स्तरावरील लोकशाही दिन सोमवार दि. 14 ऑक्टोबर, 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता कोकण भवनातील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती सभागृह, 1 ला मजला, कोकण भवन, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. लोकशाही दिनाच्या बैठकीस सर्व विभागीय स्तरावरील प्रमुख अथवा त्यांचे प्रतिनिधी यांनी उपस्थित असणे आवश्यक आहे. काही अपरिहार्य कारणामुळे उपस्थित राहणे शक्य नसल्यास त्यांनी विभागीय […]

– विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानासमोर भाजपा युवा मोर्चाचे आंदोलन चंद्रपूर :- येथे सहावीतील विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या युवक काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाने आक्रमक पवित्रा घेत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानाबाहेर शुक्रवारी जोरदार आंदोलन केले. भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com