कोदामेंढी :- शासनाच्या ई – ग्रामस्वराज या पोर्टलवर येथील ग्रामपंचायतीला मागील आर्थिक वर्ष 2023 – 24 मध्ये पंधरावा वित्त आयोगअंतर्गत 40,56,198 प्राप्त झाले आहे. त्यापैकी आतापर्यंत एकूण फक्त17,54,547 रुपये खर्च झाल्याचे नमुद आहे. मागील आर्थिक वर्षाचे 23,01,651 रुपये ग्रामपंचायतीकडे शिल्लक असताना पंधरावा वित्त आयोग अंतर्गत चालू वर्ष 2024-25 मध्ये ग्रामपंचायत मध्ये आलेल्या 34,01,790 रुपयांपैकी 1,10,000 (water way construction labourer payment) पाणी मार्ग बांधकाम मजूर पगार संबंधी खर्चावर 30 सप्टेंबर 2024 ला खर्च झाल्याचे नमूद आहे.
15 वित्त आयोगातील चालू आर्थिक वर्षातील पैसे खर्च होण्यास सुरुवात झालेली आहे, याबाबत मी अनभिज्ञ आहे, येणाऱ्या 9 तारखेला मासिक मीटिंगमध्ये याबाबत ग्रामपंचायतच्या सचिव मॅडम यांना विचारपूस करून तुम्हाला सविस्तर माहिती देतो असे येथील दहा ग्रामपंचायत सदस्यांपैकी उच्चशिक्षित व चपळ ग्रामपंचायत सदस्य म्हणून ओळखले जाणारे विष्णू बावनकुळे यांनी भ्रमणध्वनीवरून सांगितले.
एकीकडे गावात मुख्यालय न राहणारे ,अपडाऊन करून ग्रामपंचायतच्या कारभार पाहणारे , वारंवार भ्रमणध्वनी करून प्रतिसाद न देणारे ,सरपंच आशिष बावनकुळे हे गावातील समस्याग्रस्त नागरिकांना ग्रामपंचायत मध्ये एकही रुपया नसल्याचे सांगतात, परंतु पंधरावा वित्त आयोग अंतर्गत 50 लाखाच्या वर निधी ग्रामपंचायतला प्राप्त असून, तो निधी बँकेत व्याज रकमेत वाढ होण्यासाठी ठेवला आहे का ?असा प्रश्न गावातील विविध समस्यांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांनी प्रशासनासमोर मांडलेला आहे.