राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचा नागपूर दौरा

नागपूर :- राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम दि. 7 ऑक्टोबर रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नागपूर दौरा पुढीलप्रमाणे असणार आहे.

दि. 7 ऑक्टोबर रोजी रविभवन येथे आगमन. सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल गुन्हयांचा जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त नागपूर, प्रादेशिक उपआयुक्त व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर यांचे सोबत रविभवन येथे आढावा व चर्चा. दुपारी १ ते २ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचे सोबत अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येणा-या योजनांचा आढावा व चर्चा. आयुक्त, नागपूर महानगरपालिका यांचेसोबत महानगरपालिकेतील अनुसूचित जाती जमाती यांच्या समस्यांबाबत चर्चा. दुपारी २ ते ३ राखीव. दुपारी ३ ते ४ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी नागपूर यांच्या अधिनस्त असलेल्या विविध योजनेबाबत आढावा.

दुपारी ४ ते ५ नागपूर येथील समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहाच्या अडचणीबाबत गृहपाल यांचे सोबत चर्चा व वसतिगृहास भेट. सायंकाळी ५ ते ६ अनुसूचित जाती जमातीच्या विविध संघटनेसोबत चर्चा व रात्री मुक्काम.

8 ऑक्टोबर रोजी रविभवन येथून सकाळी १० वाजता शासकीय वाहनाने अमरावतीकडे प्रस्थान.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान

Sat Oct 5 , 2024
– आदिवासी बहुल गावाच्या विकासात पडणार भर – पुसद प्रकल्पातील १४७ गावांमध्ये राबणार अभियानhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 यवतमाळ :- देशातील आदिवासी जमातीच्या आर्थिक व सामाजिक विकासाकरीता प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान ही योजना राबविण्यात येत आहे. या अभियानाद्वारे संपूर्ण देशभरातील ३० राज्य व केंद्रशासित प्रदेशातील ५४९ जिल्ह्यांमधील २ हजार ७४० तालुक्यातील ६३ हजार ८४३ आदिवासीबहुल गावांचा विकास साधला जाणार आहे. पुसद आदिवासी प्रकल्पातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com