संदीप कांबळे,कामठी -होळी चा रंग उधळला मात्र जरा जपूनच कामठी ता प्र 19:-मागील दोन वर्षे कोरोना महामारीच्या सावटामुळे सन समारंभ सार्वजनिकरित्या साजरे करण्यावर निर्बंध होते .गर्दी टाळण्यासाठी चार पेक्षा जास्त व्यक्ती एका ठिकाणी एकत्र येण्यास मज्जाव असल्याने होळी सारख्या रंगाचा उत्सवही निरुत्साहीपणे साजरा करण्यात आला होता.यावर्षी मात्र परिस्थिती वेगळी होती.शिथिल झालेल्या कोरोना निर्बंधांमुळे दोन वर्षांची मरगळ झटकून नागरिकानी होळी व […]

– आकाश राऊत नागपुर – महा.अनिस च्या हिंगणा शाखेनी होळी चे निमित्त साधुन “होळी लहान करा आणि पोळी दान करा” या उपक्रमा अंतर्गत होळी चे पुजन करतांना होळीत अर्पण करणाऱ्या पुरणपोळ्या, नारळं, साखरेच्या गाठ्या व इतर खाद्यपदार्थ गोळा करुन झोपडपट्टी तील अनाथ व भटके कुटुंबांमधे वितरीत केले. या अनोख्या उपक्रमात महा. अनिस च्या कल्पना लोखंडे व निलिमा गोबाडे व शाखा […]

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा ;आमदारांना ५ कोटीचा विकासनिधी तर स्वीय सहायक व चालकांचे पगार वाढवले… मुंबई  – इकडच्या तिकडच्या योजना आणल्या… केंद्रातीलच योजना या अर्थसंकल्पात होत्या असं विरोधी पक्ष बोलत होते… मला कळत नाही यांना ‘येड पांघरूण पेडगावला जायचं होतं’ की त्यांचा ‘अभ्यास कमी होता’ म्हणून अर्थसंकल्पावर टिका करत होते असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज लगावला. […]

जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याची दिली हमी : अर्थसहाय्य योजनेतून धनादेश वितरीत नागपूर : मनपासह केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून दिव्यांगांना लाभ मिळवून देउन त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी प्रशासन आवश्यक ते सर्व प्रयत्न करेल असा विश्वास मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नागपूर शहरातील दिव्यांगांना आपुलकीचा हात दिला.             बुधवारी (ता.१६) मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी समाजविकास विभागांतर्गत वैयक्तिक अर्थसहाय्य योजनेंतर्गत […]

– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा मुंबई  : पर्यावरणपूरक होळीचे आयोजन आणि  नैसर्गिक रंगांची उधळण करत आनंदाची धुळवड साजरी करूया, असे आवाहन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.             होळीमध्ये वाईट विचार आणि कृतीचे दहन केले जाऊन सुविचारांची पेरणी केली जाते. हीच परंपरा आपण विविध स्वरूपात पुढे नेत असतो. २१ मार्च हा दिवस आपण […]

मुंबई : राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक हजार ८००  डॉक्टरांची पदे भरण्यात आली असून गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रूग्णालयातील ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही जलदगतीने करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण  मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.             विधानसभा सदस्य डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालय व महिला व बालरूग्णालयात कोविडकाळात काम करणा-या कर्मचा-यांचे वेतन आणि पदभरतीसंदर्भात विचारलेल्या […]

नागपूर : केंद्र शासनाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे नागपूर शहरातील १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांना गुरुवार १७ मार्चपासून कोर्बेव्हॅक्स लस दिली जाणार आहे. शहरातील शासकीय आणि मनपाच्या १५ केंद्रावर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी दिली. बुधवारी (ता.१६) राज्य शासनाकडून कोर्बेव्हॅक्स लस मनपाला प्राप्त झाली.             शहरातील शासकीय व मनपाच्या १७ केंद्रांवर १ जानेवारी २००८ ते १७ मार्च २०१० दरम्यान जन्मलेल्या मुले/मुलींना […]

नागपूर – पारकर हनीफान इंडिया प्रा.लि. बाजारगांव येथे ५१ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह समारोह साजरा करण्यात आला. दिनांक ०४ ते १० मार्च पर्यंत चालणाऱ्या या सप्ताहात कारखान्यात कामगारांच्या एकूण सुरक्षे विषयी प्रशिक्षण देण्यात आले. त्यात प्राथमिक उपचार फायर मॉक ड्रिल, कामगारांचे आरोग्य तपासणी व सुरक्षा संबंधित सुलोगन स्पर्धा, कविता स्पर्धा, निबंध स्पर्धा असे अनेक प्रकारचे कार्यक्रम राबविण्यात आले. यावेळी कामगारांनी […]

नागपूर : नागपूर शहरातील तापमानात वाढ होउ लागली आहे. वाढत्या उन्हामुळे उष्माघातासारख्या गंभीर आजारांचा धोका संभावतो. उष्णतेच्या लाटेपासून होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर निघणे शक्यतो टाळा, उन्हाच्या वेळेत बाहेर फिरणे टाळा, भरपूर पाणी प्या, स्वत:सह इतरांच्याही तब्येतीची काळजी घ्या, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे करण्यात आले आहे.             उष्माघात टाळण्यासाठी मनपातर्फे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार, भरपूर पाणी पिणे, हलकी, पातळ व सच्छिद्र कपडे वापरणे, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री […]

नागपूर येथे 27 मार्चला ‘ऐरोमॉडेलिंग शो’ 25 ते 30 विमानांचे आकाशातून पथ संचलन होणार विशेष कामगिरी करणाऱ्या एन.सी.सी. कॅडेटस् चा सत्कार पाच हजारावर विद्यार्थी ‘ऐरोमॉडेलिंग शो’ चा आनंद घेणार             नागपूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त येत्या 27 मार्च रोजी शहरातील मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत ‘ऐरोमॉडेलिंग शो’चे आयोजन करण्यात आले आहे. या ‘ऐरोमॉडेलिंग शो’च्या आयोजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम निर्मितीला चालना मिळणार […]

वेकोलि सुरक्षा रक्षकांची कारवाई तीन आरोपीवर गुन्हा दाखल.   कन्हान : –  पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस १७ कि मी अंतरावरील वेकोलि खुली कोळसा खदान इंदर कोळ सा यार्ड चिरादेव शिवार येथुन तीन आरोपींतानी कोळ सा चोरून नेल्याने वेकोलि खुली खदान सुरक्षा रक्षकां नी चोरीचा कोळसा २२७९० टन किमत  १,१३,९५० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून कन्हान पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केल्याने तीन आरोपी विरुद्ध गुन्हा […]

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष पदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत सर्वाधिक  ५ लाखांहून अधिक मते घेणाऱ्या कुणाल राऊत यांची आज प्रदेशाध्यक्ष पदी निवड घोषित करण्यात आली. अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी  जारी केलेल्या पत्राद्वारे राऊत यांची नियुक्ती आज जाहीर करण्यात आली. कुणाल राऊत यांची युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड जाहीर झाल्यामुळे काँग्रेसमध्ये राज्यभरात आणि नागपुरात आनंदाचे […]

संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 16 :- 26 सप्टेंबर 2018 ला झालेल्या ग्रा प सार्वत्रिक निवडणुकीत (कवठा)म्हसाळा 12 सदस्यीय ग्रा प मध्ये सरपंच पदी अनिता धर्मराज आहाके तर उपसरपंच पदी शरद माकडे निवडून आले होते .दरम्यान गावातील शासकीय पांधण रस्त्यावर अवैधरित्या अतिक्रमण करून घर बांधल्याप्रकरनी 20 फेब्रुवारी 2019 ला सरपंच अनिता आहाके व सदस्य (सरपंच पती)धर्मराज आहाके हे अपात्र घोषित […]

सतीश कुमार,गडचिरोली जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटप गडचिरोली,(जिमाका)दि.16: विशेष भुसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गडचिरोली यांचे कार्यालय अंतर्गत वडसा-गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पाकरिता मौजा काटली, साखरा, महादवाडी, अडपल्ली, गोगाव, लांझेडा, गडचिरोली व मोहझरी पॅच येथील रेल्वे प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या खाजगी जमिनीचे भुसंपादन काम सुरू आहे. त्याअंतर्गत विशेष भुसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, गडचिरोली यांचे कार्यालयाकडून दिनांक 11.03.2022 […]

संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 16:- दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. दिव्यांगांना शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य आहे. प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला शासकीय योजनेचा लाभ मिळावा, या उद्देशाने दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत […]

मुंबई : केंद्र शासनाच्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ कायदा (कोटपा)-२००३ ची राज्यभर अंमलबजावणी करण्यात येत असून या कायद्यानुसार शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्डच्या परिसरामध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, उत्पादन, वितरण, साठवण करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था धोरणांतर्गत सर्व शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिसरामध्ये पिवळी रेषा रेखांकित केली जात असून ज्या शाळा पिवळी रेषा रेखांकित करणार नाही, अशा शाळांवर कारवाई करण्यात […]

– चोरीचा कोळसा १७.७९० टन किंमत ८८९५० रूपयाचा पकडुन चार आरोपीवर गुन्हा दाखल.    कन्हान : – मा. पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामिण यांचे आदेशाने पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत स्थागुअशा नागपुर (ग्रा) पथकाने गोंडेगाव खदान परिसातील दोन अवैद्य कोळशा टालवर धाड टाकुन वेकोलि खुली खदान येथुन चोरी केलेला १७.७९० टन दगडी कोळ सा किंमत ८८९५० रूपयाचा मुद्देमाल जप्त करून चार आरोपीवर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करिता कन्हान पोलीस […]

नागपुर – बहुजन समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष मान्यवर कांशीरामजी यांची 88 वी जयंती नागपूर शहरात विविध विधानसभा स्तरावर बहुजन समाज दिवस म्हणून साजरा करण्यात आला. मुख्य समारोह नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, शहराध्यक्ष राजीव भांगे, शहर प्रभारी चंद्रशेखर कांबळे, माजी  प्रदेश सचिव उत्तम शेवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बसपा च्या मुख्यालयात व कामठी रोडवरील कांशीराम टी पॉईंट वर साजरा करण्यात आला. याप्रसंगी […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com