नागपूरात ठीक ठिकाणी कांशीराम जयंती 

नागपुर – बहुजन समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष मान्यवर कांशीरामजी यांची 88 वी जयंती नागपूर शहरात विविध विधानसभा स्तरावर बहुजन समाज दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
मुख्य समारोह नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, शहराध्यक्ष राजीव भांगे, शहर प्रभारी चंद्रशेखर कांबळे, माजी  प्रदेश सचिव उत्तम शेवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बसपा च्या मुख्यालयात व कामठी रोडवरील कांशीराम टी पॉईंट वर साजरा करण्यात आला.
याप्रसंगी बहुजन समाज पार्टी  चे शहर उपाध्यक्ष सादाब खान, नगरसेवक इब्राहिम टेलर, माजी शहराध्यक्ष राजू चांदेकर, महेश सहारे, माजी नगरसेवक संजय जयस्वाल, गौतम पाटील, देवेंद्र वाघमारे, माजी जिल्हाध्यक्ष विलास सोमकुवर, विधानसभा अध्यक्ष जगदीश गजभिये, बबन पाटील, सचिन कांबळे, जयेश गेडाम, चंद्रशेखर भंडारे, नितीन डोंगरे, सुमित कापसे, विवेक सांगोळे, परेश जामगडे, पंकज मेश्राम, बुद्धम् राऊत, स्नेहल उके, राजेश नंदेश्वर, नरेंद्रकुमार पाली, प्रीती बोदेले, प्रियंका भिवगडे, बलवंत राऊत, सुनील डोंगरे, राजेन्द्र सुखदेवे, गौतम सरदार, अनिल साहू, मॅक्स बोधी, अभिलाष वाहाने, सुधाकर सोनपिपळे, राजकुमार बोरकर आदी प्रमुख कार्यकर्ते याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
संविधान चौकात सन्मान व समारोप
मान्यवर कांशीरामजी सोबत अनेक वर्षे कार्य केलेल्या नागपुरातील बामसेफ च्या किशोर गोसावी, डॉ पिंपळकर, अड हेमंत मेश्राम, रंजित पखिड्डे, दिगंबर चांदेकर, सिद्धार्थ देशभ्रतार या 6 जेष्ठ कार्यकर्त्यांना या प्रसंगी संविधान चौकात बसपा च्या वतीने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी त्यांच्याच हस्ते कांशीरामजी ह्यांच्या जन्मदिनाचा केकही कापण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बसपा चे जेष्ठ नेते उत्तम शेवडे ह्यांनी केले, समारोप युवा नेते सदानंद जामगडे ह्यांनी केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर प्रभारी चंद्रशेखर कांबळे होते.या प्रसंगी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
स्कुटर रैली
बहुजन समाज दिवस निमित्ताने दक्षिण व दक्षिण पश्चिम विधानसभा द्वारे बाईक रैली चे आयोजवन केले होते. ही स्कुटर रैली कांशी नगरातील शहर बसपा कार्यालयातून निघाली. रैलीचे नेतृत्व ओपुल तामगाडगे, सुनंदा नितनवरे, सूरज येवले, नितीन वंजारी, सुरेखा डोंगरे ह्यांनी केले. ह्या रैलीचा समारोप संविधान चौकात झाला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

स्थानिक गुन्हे शाखा  नागपुर (ग्रा) पथकाची गोंडेगाव खदान परिसातील दोन अवैद्य कोळशा टालवर कारवाई 

Wed Mar 16 , 2022
– चोरीचा कोळसा १७.७९० टन किंमत ८८९५० रूपयाचा पकडुन चार आरोपीवर गुन्हा दाखल.    कन्हान : – मा. पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामिण यांचे आदेशाने पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत स्थागुअशा नागपुर (ग्रा) पथकाने गोंडेगाव खदान परिसातील दोन अवैद्य कोळशा टालवर धाड टाकुन वेकोलि खुली खदान येथुन चोरी केलेला १७.७९० टन दगडी कोळ सा किंमत ८८९५० रूपयाचा मुद्देमाल जप्त करून चार आरोपीवर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करिता कन्हान पोलीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com