नागपूर :- फिर्यादी सुनिल गुलाबराच तानोडकर, वय ५३ वर्षे, रा. प्लॉट नं. ३९, सितानगर, हिंगणा रोड, एम.आय.डी. सी., नागपूर यांची त्यांचे मित्राचे माध्यमातुन कामगार नगर चौक, स्वामी सिटी, ई बाईक कंपनी शोरूम, कळमणा रिंग रोड, कपिलनगर, नागपूर येथे आरोपी नामे योगेश टेभुर्णीकर रा. टेकानाका, कपिलनगर, नागपूर वाचे सोबत झाली. त्याने आरोपी क. २ रोशन गोंडाने रा. टेकानाका, कपिलनगर, नागपूर हा विदर्भ डिस्टीब्यूटर ई बाईक मार्केटींग हेड आहे. असे सांगुन फिर्यादी व मित्राला आर ध्रुव ग्रिन कनेक्ट प्रा. लि. वावत माहिती दिली व त्यांना नेटवकाँग मार्केटचे एलॅनींग सांगीतले व ई बाईकची एरीया डिलर्शीप देण्याचे आमीष दाखविले, दिनांक १०.०२.२०२३ ते दि. ३०.०६. २०२४ दरम्यान आरोपींनी तसेच कंपनीचे व्यवस्थापक आरोपी क. ३) जयवंत सखाराम गवस रा. सावंतवाडी, रत्नागिरी या सर्वांनी संगणमत करून फिर्यादी कडून ई बाईकची एजेन्सी देण्याचे आमीष दाखवुन एकुण २,६५,०००/- रू. घेतले व फिर्यादीस ई बाईकची एजेन्सी व कोणतेही कमिशन न देत्ता तसेच रक्कम परत मागीतली असता रक्कम परत न करता टाळाटाळ केली, फिर्यादी यांनी आरोपींचे बाबत अधिक चौकशी केली असता आरोपींनी फिर्यादी प्रमाणेच अभय नवघरे चंद्रपूर यांचे कडुन ३४ लाख रूपये तसेच दिगांबर चाटोर रा. सडक अर्जुनी यांचे कडुन २.६५,०००/-रू. व रजु बव्हाण तुमसर, अतुल मेश्राम भंडारा, मोहम्मद अब्दुल कादीर शेख भद्रावती, चंद्रपूर, रमेश मुसरे भोपाल व
अक्षय राहंगडाले नागपूर यांचे कडुन ई बाईकचे नेटवकॉंगचे नावाखाली एकुण ५६,३७,५००/- रू. घेवुन फिर्यादी व इतरांचा अन्यायाने विश्वासघात करून आर्थिक फसवणुक केली.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे कपिलनगर येथे सपोनि. ढोकणे यांनी आरोपींविरूध्द कलम ४२०, ३४ भा.द.वी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.