नागपूर :- महाराष्ट्र पोलीस स्थापना सप्ताह-२०२५ (रेजींग डे) अंतर्गत रश्मीता राव पोलीस उप आयुक्त परिमंडळ क. ०४ यांचे संकल्पनेतुन दि. २८.०१.२०२५ रोजी ‘स्वच्छ असोसीएशन” यांचे सौजन्याने परिमंडळ २४ अंतर्गत संपुर्ण पोलीस ठाणे येथील परिविक्षाधीन पोलीस उपनिरिक्षक यांचे हस्ते पोलीस ठाणे चे आवारात एकुण ५४ वृक्षारोपन करण्यात आले.
पोलीस ठाणे नंदनवन येथे जेष्ठ नागरीकांना त्यांच्या तक्रारी व समस्या, अडी-अडचणी जाणुन घेण्याकरीता जेष्ठ नागरिकां करीता नव्याने बांधण्यात आलेल्या जेष्ठ नागरिक कक्षाचे उद्घाटन दि. ०८.०१.२०२५ रोजी मा. श्रीमत्ती रश्मीता राव पोलीस उप आयुक्त, परिमंडळ क. ०४ यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जेष्ठ नागरिकांचे पुष्प देवुन स्वागत करण्यात आले. पोलीस व जेष्ठ नागरिक है एकाच परिवाराचे सदस्य असुन एक परिवार असल्याची भावना निर्माण करून त्यांचे समाधान करण्यात आले. तसेच त्यांचे कडे येणारे-जाणारे यांचे बाबत माहिती घेवुन दररोज त्यांचे घरी क्युआर कोड लावुन नियमीत पेट्रोलींग करण्याचे व त्यांचे संरक्षण करण्याचे आदेश मा. पोलीस उप आयुक्त यांनी प्रभारी अधिकारी यांना दिले, याप्रसंगी २५ ते ३० जेष्ठ नागरिक वरिष्ठ पोलीस निरिक्षक विनायक कोळी, जयवंत पाटील, तसेच अधिकारी व अंमलदार हजर होते.