संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नुकत्याच 18 जानेवारीला झालेंल्या 27 ग्रामपंचायती निवडणुकीतील परसाड ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक वादग्रस्त ठरल्याने ही उपसरपंच पदाची निवडणूक रद्द करून काल 23 फेब्रुवारीला फेरनिवडणूक घेण्यात आली ज्यामध्ये उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली या घटनेला विराम मिळत नाही तोच पंचवार्षिक कार्यकाळ संपण्याच्या मार्गावर असलेल्या कामठी तालुक्यातील लोणखैरी ग्रा प च्या प्रभाग क्र 1 च्या ग्रामपंचायत सदस्य मृत्यू पावल्याने तसेच कवठा ग्रा प चे उपसरपंच अपात्र घोषित झाल्याने त्यांच्या रिक्त ठिकाणच्या अंतिम मतदार यादी करण्याच्या सूचना निवडणूक विभागाला देण्यात आल्या असून यानुसार लोणखैरी प्रभाग क्र 1 नामाप्र (महिला)प्रवर्गातील रिक्त जागा व कवठा ग्रा प च्या प्रभाग क्र 1 चे नामाप्र प्रवर्गातील रिक्त जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक होणार आहे.
लोंणखैरी ग्रा प चा पंचवार्षिक कार्यकाळ हा 10 फेब्रुवारी 2026 ला संपणार असून या प्रभागातील ग्रा प सदस्य उषा नत्थुजी अंजनकर ह्या 1 डिसेंबर 2022 ला अकस्मात मरण पावल्याने त्यांच्या रिक्त ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे. तसेच कवठा ग्रा प पंचवार्षिक कार्यकाळ हा 29 डिसेंबर 2023ला संपणार असून कवठा ग्रा प चे प्रभाग क्र 1 चे नामाप्र प्रवर्गातील ग्रा प सदस्य व उपसरपंच शरद माकडे हे कलम 14 (1)(ग)अनव्ये अपात्र झाल्याने त्यांच्या रिक्त ठिकाणी लवकरच पोटनिवडणूक होणार आहे.