उमरेड :- गुन्हेशाखा युनिट क. ५ चे अधिकारी व अंमलदार हे आरोपींचे शोधात पेट्रोलींग करीत असता, त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, सापळा रचुन पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत शनीचरा बाजार, फायर ब्रिगेडचे बाजुला, उभा असलेल्या एका संशयीत ईसमास ताब्यात घेतले त्याची अंगझडती घेतली असता त्याचेजवळ पिवळया धातुचे सोन्याचे दागीने मिळुन आले. त्यास पोलीस ठाणे येथे आणुन विचारपुस केली असता तसेच त्याचा अभिलेख तपासला असता तो सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव विक्की योगेश डहेरिया वय २३ वर्ष रा. झाडे चौक, दहीबाजार, शांतीनगर, नागपुर, असे सांगीतले. त्याने कडील मुद्देमालाबावत सखोल विचारपुस केली असता त्याने त्याचे साथीदार पाहीजे आरोपी क. २) श्री उर्फ मंथन मोरेश्वर साकुरे रा. शांतीनगर ३) गुरुप्रीतसिंग परविंदर सिंग भाटीया उर्फ पाजी रा. यशधिरानगर यांचेसह संगणमत करून दिनांक २८.११.२०२४ चे २०.०० वा. चे सुमारास, वायगाव घोटुर्ती, ता. उमरेड, जि. नागपुर येथे घरफोडी केल्याचे व त्यातील हा मुद्देमाल असल्याचे सांगीतले. नमुद बाबत खात्री केली असता पोलीस ठाणे उमरेड येथे फिर्यादी जितेंद्र बालकेश्वर शर्मा वय ५४ वर्ष रा. समाजभवन जवळ, वायगाव घोटुलों, ता. उमरेड, जि. नागपुर यांचे तकारीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल असल्यावाचत माहीती मिळाली. आरोपीचे ताब्यातून सोन्याने दागीने एकुण वजनी अंदाजे ७० ग्रॅम किंमती ४,३१,२००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीस मुद्देदमालासह पुढील तपासकामी उमरेड पोलीसांचे ताब्यात दिले.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि. राहुल शिरे, पोउपनि, राहुल रोटे, पोहवा, टष्णुलाल चुटे, राजेंद्र टाकळीकर, चंद्रशेखर गौतम, नापोअं. गणेश ठाकरे, प्रमोद बावणे, अनिस खान, व पोअं. विशाल नागभिडे, देवचंद थोटे, रोशन तांदुळकर, सुनिल यादव, अमोल भक्ते यांनी केली.