‘पौर्णिमा दिवसा’ निमित्त लॉ कॉलेज चौक परिसरात जनजागृती

– एक तास अनावश्यक वीज दिवे बंद करून नागरिकांचे सहकार्य

नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या वतीने माजी आमदार व शहराचे माजी महापौर श्री. अनिल सोले यांच्या मार्गदर्शनात मागील अनेक वर्षांपासून पौर्णिमा दिवस अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून शनिवारी ३ जून रोजी रात्री लॉ कॉलेज चौक परिसरात जनजागृती करण्यात आली.

विशेष म्हणजे, मोहिमेंतर्गत जनजागृती करताना स्वतः प्रा. सोले प्रामुख्याने उपस्थित होते. माजी नगरसेवक सुनील अग्रवाल यांनीही विशेषत्वाने उपस्थित राहून स्वयंसेवकांना प्रोत्साहित केले.

वीज बचतीसाठी सुरू करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण उपक्रमामध्ये ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी नागरिकांना एक तासासाठी अनावश्यक वीज दिवे बंद करण्याचे आवाहन केले. ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तव चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, बिष्णुदेव यादव, श्रीया जोगे, प्रिया यादव यांच्यासह सर्वश्री भोलानाथ सहारे, कमलेश चाकोले, सुधीर कपूर, सुरेश रेवतकर, धनराज तेलंग, मितेश बाहे, अपूर्व डे यांनी जनजागृती केली.

जनजागृती उपक्रमा दरम्यान ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी परिसरातील व्यापारी बांधवाना, आस्थापनांना भेट देउन तिथे वीज बचतीचे महत्व सांगितले व नागरिकांना किमान १ तास अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन केले. परिसरातील व्यापारी बांधवांनीही मनपा व ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विद्युत दिवे बंद करून उपक्रमात आपले योगदान दर्शविले.

NewsToday24x7

Next Post

Governor Bais performs Bhumi Pujan for Ashwamedh Maha Yagya in Mumbai

Mon Jun 5 , 2023
Mumbai :- Maharashtra Governor Ramesh Bais attended the Bhumi Pujan ceremony for the hosting of the 48th Ashwamedh Mahayagya at Central ground, Kharghar, Navi Mumbai on Sunday (4 June). The Maha Yagya is being organised by the Gayatri Parivar, Shanti Kunj Haridwar from 23 to 28 January 2024. Minister of Culture Sudhir Mungantiwar, Pro Vice Chancellor of Dev Sanskti Vishwa […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com