नागपूर :- गुन्हेशाखा सामाजीक सुरक्षा विभाग पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत, सद्भावनानगर, दुरूगकर यांचे क्लीनीकचे बाजुला नंदनवन नागपुर येथे सापळा रचुन एका इसमास ताब्यात घेवुन त्यांचे नाव पत्ता विचारले असता, त्यांनी आपले नाव मोहम्मद अबरार मोहम्मद निसार अंसारी वय २३ वर्ष रा. प्लॉ. नं. १६३, सद्भावनानगर, नागपुर असे सांगीतले, त्यांची झडती घेतली असता, त्यांचे ताब्यातुन एका प्रेसलॉक पन्नीमध्ये ५२. ९२ ग्रॅम एम. डी. पावडर, व एक मोबाईल फोन व रोख ११,०००/- रू तसेच त्याचे घरझडतीत रोख ५०,०००/-रू तसेच एक लोखंडी तख्यार असा मुद्देमाल मिळुन आला, आरोपींचे ताब्यातुन सपुर्ण मुद्देमाल एकुण किमती ६,०५,७००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीचे कृत्य हे कलम ८ (क), २२ (क) २९ एन.डी. पी.एस. अॅक्ट, सहकलम ४/२५ भा.ह.का, सहकलम १३५ म.पो.का नुसार होत असल्याने, आरोपींविरूध्द पोलीस ठाणे नंदनवन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीस मुद्देमालासह पुढील कारवाई कामी नंदनवन पोलीसांचे ताब्यात देण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपुर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपुर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली, पोनि, रविंद्र नाईकवाड, सपोनि, शिवाजी नन्नावरे, पोहवा प्रकाश माथनकर, सचीन बहीये, लक्ष्मण चौरे, अजय पवनिकर, पोलीस अंमलदार कमलेश क्षीरसागर, व मपोहवा लत्ता गवई यांनी केली.