कन्हान :- पोलीस स्टेशन कन्हान हद्दीत ३१ डिसेंबरला रात्री सर्व जग नववर्ष साजरा करण्याची तयारी करीत असताना, यातील फिर्यादीची पत्नी ही मेयो नागपूर येथे उपचार घेत होती तिला भेटण्याकरीता पती सायंकाळी ०६ वाजता नागपूर ला गेला व रात्री ०१ वाजता परत आला असता घरात अलमारी मधून सोन्याचे दागीने ३,४२,४००/- रू. व चांदीचे दागीने किंमत २२,२००/- रू. व नगदी ८०,०००/-रु. अशा एकुण ४४४६००/- रूपयाचा माल चोरून नेला पोस्टे कन्हानला फिर्यादीच्या रिपोर्ट वरून अप.क. ०३/२४ कलम ४५७, ३८० भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला, वरिष्ठांनी घटनास्थळी भेट देवून आरोपी शोधण्यास तपासाला सुरूवात झाली असता पोलीसांना समजले की, गुन्हयात परफोडी करण्याकरीता लाल रंगाची पल्सर गाडी वापरण्यात आली होती यावरून आरोपी पर्यंत पोलीस पोहचताच आरोपीला पोलीसाची चाहूल लागताच आरोपी पल्सर गाडी लपवून कन्हान सोडून पसार झाला. पोलीसांना आरोपीने पल्सर गाडी कुठे ठेवली व आरोपी कुणासोबत फिरला याची गोपनीय माहीती मिळाली यावरून सदर आरोपी दुर्गला असल्याचे कळले सदरची माहीती वरिष्ठांना देवून अट्टल चोरटे असल्याने एक टिम तयार करण्यात आली, त्याच दिवशी या गुन्हयातील सोन्याचांदीचे दागीने आरोपीने ज्या सोनाराकडे विकले त्याची गोपनीय माहीती पोलीसांना मिळाली आरोपी विक्की उर्फ विद्वो याला ताब्यात घेवून सखोल विचारपूस केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली व मुख्य आरोपी परराज्यात असल्याने वरीष्ठाच्या आदेशाने गुन्हयातील आरोपी दादु उर्फ आकाश यशवंत परडे रा. कन्हान याला पोलीसांनी दुर्ग मधून पकडून आणले यानी गुन्हयाची कबुली दिली. व या गुन्हयात अजून २ आरोपी असून ते फरार असल्याचे सांगितले. पोलीस त्यांचा शोध घेत आहे. पोलीसांनी आपले कौशल्य दाखवून आरोपी व सोनाराकडून पूर्ण माल हस्तगत केला याप्रकारे नियोजनबंध कार्यकुशलता दाखवून अट्टल चोरटयांना पोलीसांनी एक महीन्यातच पकडून पूर्ण माल हस्तगत केला. यामुळे कन्हान नागरीकामध्ये पोलीस अधिक्षक सा. यांच्या उत्कुष्ठ कार्यकुशलेची बर्चा रंगली आहे. पुढील तपास सपोनी राहुल बव्हान पोस्टे कन्हान हे करत आहेत.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक हर्ष पोहार व अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पुंडलिक भटकर यांचे आदेशाने कन्हान पो.स्टे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, व पो. नि. उमेश यादव पोहवा हरीष सोनभद्र, पोना महेश विसने, पोशि निखील मिश्रा स्थानिक गुन्हे शाखेचे व. पो. नि. ओमप्रकाश कोकाटे पोउपनी बटुलाल पांडे, सफौ नाना राउत पोहवा विनोद काळे, इकबाल शेख, पोना संजय बरोदीया, पोशि निलेश इगुलकर, चापोहवा मुकेश शुक्ला पो.स्टे. खापरखेडा चे कर्मचारी पोनि धनाजी झडक, पोउपनि आर. नरोटे, पोहवा शैलेश यादव, प्रफूल राठोड, पोना मुकेश वाघाडे, राजु भोयर, पोलीस अंमलदार राजकुमार सानूर पोहवा कवीता गोंडाने या सर्व अधिकारी व कर्मचारी यानी पोलीस अधिक्षक सा मार्गदर्शनात संयुक्तपणे उत्कृष्ट नियोजन करून पार पाडली.