छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी.

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 19 :- सफाई कामगार मुलामुलींची शासकीय निवासी शाळेत 19 फेब्रुवारी 2023 ला छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली या प्रसंगी शिवाजी महराज यांच्या प्रतिमेला माल्यारपण करून अभिवादन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनावर भाषण प्रस्तुत केले तसेच पोवाडा च्या माध्यमातून शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज,अफझल खान जिजामाता यांच्या वेशभूषा करून शिवाजी महाराज यांच्या जीवनातील सुंदर झांकी प्रस्तुत केली तसेच माहराजांच्या प्रतिमेची पालखी सजवून वाठोडा नगपुर यापरिसरत प्रभातफेरी काढण्यात आली. शिवाजी जयंती निमित्त विद्यार्थ्यांना मिष्ठान्न वितरीत करण्यात आले

शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर तसेच बह्यास्त्रोत कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते.सदर कार्यक्रमचे संचालन विशाखा गणोरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री मंगेश राठोड यांनी केले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com