पोरवाल महाविद्यालयामध्ये सेठ केसरीमल पोरवाल यांचा स्मृतिदिवस आयोजित

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय कामठी येथे दिनांक ७ ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता सेठ केसरीमल पोरवाल यांचा स्मृतिदिवस साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कृपाल तुमाने (लोकसभा सदस्य )रामटेक हे उपस्थित राहणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून परिणय फुके, विधान परिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहणार आहे. ह्या स्मृती दिवसाच्या निमित्ताने राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे. वादविवाद स्पर्धेचा विषय  ” ह्या सभेच्या मते स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात भारत हा खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर राष्ट्र बनला आहे. ” हा ठेवण्यात आला आहे. याप्रसंगी वादविवाद स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना  पुरस्कार दिले जातील. या सोहळ्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ कामठीचे अध्यक्ष सुनीलकुमारजी पोरवाल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय चव्हाण, उपप्राचार्या डॉ.रेणू तिवारी, कार्यक्रमाचे समन्वयक उपप्राचार्य डॉ. मनिष चक्रवर्ती,तसेच एस.पी.एम. चे पदाधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित राहणार आहेत. तसेच इतर महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी बहुसंख्य संख्येने ह्या वादविवाद स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय चव्हाण यांनी केले आहे.

NewsToday24x7

Next Post

दोन आठवड्यानंतर कामठी नगर परिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार..

Mon Oct 3 , 2022
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  – नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाकडे इच्छुकांच्या नजरा कामठी ता प्र 3 :- नगर पालिकेत प्रलंबित असलेला ओबीसी आरक्षण आणि राज्यातील प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भातील याचिकांची सुनावणी सुप्रीम कोर्टात आता दसऱ्यानन्तर होणार आहे.राज्य सरकारने दोन आठवडे वेळ मागितली होती त्यावर सर्वोच्च न्यायालयाने वेळ वाढवून देण्यास राज्य सरकारला मंजुरी दिली आहे त्यानुसार दोन आठवड्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचे चित्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com