– काटोल पोलिसांनी १५ दिवसात २० घरफोडीचा लावला शोध
– पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांची दमदार कामगिरी
– पोलिस अधीक्षक विशाल आनंद, डी वाय एस पी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाला यश.
काटोल :-गेल्या वर्षभरापासून काटोल व आजूबाजूच्या परिसरात घरफोडीचे प्रमाण तसेच दुकान फोडीचे प्रकार वाढले होते याबाबतीत काटोल पोलीस स्टेशनमध्ये सभा सुद्धा झाली होती काटोल व आजूबाजूच्या परिसरात चोरांची दहशतीने ग्रामस्थ घाबरून गेले होते. ऐकटे घर सोडून बाहेरगावी जाण्याची हिम्मत कुणामधे राहली नव्हती. नुकतेच एका महिन्यापूर्वी रुजू झालेले पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी पोलीस अधीक्षक विशाल आनंद नागपूर ग्रामीण व उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनात घरफोडी व दुकान फोडी करणाऱ्या चोरांचा शोध लावण्याकरिता विशिष्ट चमू नेमून त्यांना कामी लावले काही दिवसातच काटोल पोलिसांच्या चमूला घरपोडी करणाऱ्या चोरांचा सुगावा लागला लगेच त्यांनी छत्तीसगड येथील बलोत सेंट्रल जेल गाठले येथून चरण सिंग फद्दूसिंग भादा वय वर्षे 33 तसेच संदभ सिंग जगजीत सिंग बावरी 38 वर्ष पांढुर्णा येथील रहिवासी यांना काटोल येथील पोलिस स्टेशन येथे आणून शनिवार पर्यंत पीसीआर घेण्यात आला आरोपींनी गुन्हा नोंदणी क्रमांक 74 / 23, 640/23, 671/23, 714/ 23 घरफोडी केल्याचे मान्य केले. त्यांच्याकडून सोना चांदी असे एकूण तीन लाख 90 हजार रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वर्षभरापासून होत असलेल्या चोऱ्या यांना आळा बसेल अशी अपेक्षा काटोल व आजूबाजूच्या ग्रामस्थांनी वर्तवलेली आहे पोलीस अधीक्षक नागपूर उपविभागीय पोलिस अधिकारी काटोल तसेच अशोक कोळी पोलीस निरीक्षक व त्यांच्या पोलीस चमुचे ग्रामस्थांन कडून अभिनंदन होत असून अशोक कोळी यांची बदली थांबविण्याची मागणी परिसरातील सामाजिक संघटनेकडून होत आहे.