चोरीचे दागिने घेणारा सराफा दिल्ली विमानतळावर जेरबंद

– रेल्वेत लूट करणार्‍या हरयाणाच्या सासी टोळीकडून घेतले दागिने

– आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर :- रेल्वेत चोरी करणार्‍या हरयाणातील सासी टोळीकडून चोरीचे दागिने खरेदी करणार्‍या सराफा व्यापार्‍याला दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून वितळविलेले 8 लाखांचे सोने जप्त करण्यात आले. रवींद्र ऊर्फ रवी सोनी (38, हासी, हरियाणा) असे अटकेतील सराफाचे नाव आहे.

हरियानातील सासी टोळीत पाच सदस्य आहेत. या टोळीने नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि बल्लारशाह येथे धुमाकूळ घातला होता. ही टोळी धावत्या रेल्वेत चोरी करायची. या टोळीने सिकंदराबाद – हिस्सार एक्सप्रेससधूनही प्रवाशांचे दागिने चोरले. फिर्यादी दिलीप कुमार पुरोहित हे कुटुंबीयांसह हिस्सार एक्सप्रेच्या एसी डब्यात 19, 20 आणि 22 नंबरच्या बर्थने प्रवास करीत होते. वर्धेजवळ त्यांच्या ट्राली बॅगमध्ाून 33 लाख 50 हजार रुपये किंमतीचे दागिने, डायमंड असा ऐवज चोरीस गेला. फिर्यादीच्या तक्रारीवरून लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता.

सराफा व्यापारी रवींद्र हा नेहमीच चोरीचे दागिने खरेदी करून ते वितळवायचा. त्यापासून नवीन दागिने तयार करून त्याची विक्री करायचा. पुरोहित यांचे दागिने त्याने खरेदी करून ते वितळविले. दरम्यान पोलिसांनी हरयाणातून दोन आरोपीं अटक केली. इंदर ऊर्फ बबला सासी (35), संजय सासी (36) (हरियाणा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिस कोठडी दरम्यान आरोपींनी सराफा व्यापार्‍याला दागिने विकल्याची माहिती दिली होती. ही कारवाई पोलिस निरीक्षक विकास कानपिल्लेवार, उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, महेंद्र मानकर, चंद्रशेखर मदनकर, श्रीकांत धोटे, चंद्रशेखर येडेकर, विनोद खोब्रागडे, नितीन शेंडे, राहुल यावले, मंगेश तितरमारे, अविन गजबे, गिरीश राउत यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घराच्या आत आग लागुन जिवनापयोगी सामुग्रीची राखरांगोळी

Mon Sep 4 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- कांद्री वार्ड क्र. ३ ढिवर मोहल्ला शिवनगर येथे घर मालक बाळकृष्ण मनघटे यांचा मागील भागाच्या घराला अचानक आग लागल्याने घरातील कपडे सह जिवनापयोगी सामुग्री जळुन राख रांगोळी होऊन अंदाजे चाळीस हजार रुययांचे नुकसान झाल्याचे भाडे करु अनिल शुक्ला यांनी सांगितले. प्राप्त माहिती नुसार अनिल जगदीश शुक्ला वय ५० वर्ष हे मागील ४ वर्षा पासुन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com