नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या लेख व वित्त विभागातील अंदाजपत्रक अधिकारी संजय मेंडूले हे आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. सेवानिवृत्ती निमित्त सोमवार (ता.३१) रोजी मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील दालनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात त्यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.संजय मेंडूले यांची नागपूर महानगरपालिका येथे सन १९९० साली महापौर कार्यालयात स्थायी नियुक्ती करण्यात आली. तत्पूर्वी त्यांनी १९८१ ते १९८४ दरम्यान आरोग्य विभागात हंगामी कर्मचारी म्हणून कार्य केले. तर १९८४ ते १९९० या दरम्यान वाचनालय व कर आकारणी विभागात रोजंदारी कर्मचारी म्हणून आपली सेवा दिली. सन १९९० मध्ये स्थायी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी तत्कालीन महापौर सर्वश्री बबनराव येवले, वल्लभदास डागा, सुधाकरराव निंबाळकर, किशोर डोरले, अटलबहादूर सिंग, राजेश तांबे, कुंदा विजयकर, देवेन्द्र फडणवीस यांच्या कार्यकाळात उत्तम कार्य केले. संजय मेंडूले यांची १९९७ मध्ये जकात विभागात राजस्व निरीक्षक पदावर नियुक्ती झाली, सन २०१३ ते २०१७ दरम्यान ते एलबीटी विभागात सहा. अधीक्षक म्हणून कार्यरत होते. तर सन २०१७ ते मार्च २०२२ पर्यंत त्यांनी तत्कालीन महापौर नंदा जिचकार, सर्वश्री संदीप जोशी, दयाशंकर तिवारी यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्य केले. त्यानंतर मार्च २०२२ पासून ते लेख व वित्त विभागातील अंदाजपत्र अधिकारी म्हणून सेवेत होते. ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी ते अंदाजपत्र अधिकारी या पदावर असताना सेवानिवृत्त झाले.
अंदाजपत्रक अधिकारी संजय मेंडूले सेवानिवृत्त
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com