पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी (महिला) स्पर्धा

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संघाचा चारूतर विद्यापीठ संघावर 52 गुणांनी विजय

अमरावती :-  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी (महिला) स्पर्धेच्या तिस­या दिवशीच्या सकाळच्या सत्रात आठ संघांमध्ये अटीतटीची लढत झाली. त्यामध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संघाने चारुतर विद्या मंडल विद्यापीठ, गुजरात संघावर तब्बल 52 गुणांनी विजय मिळविला असून अमरावती विद्यापीठ संघाने 69 विरुध्द 17 गुणांनी हा सामना जिंकला.

गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद विरुध्द पी.डी.यु.एस.विद्यापीठ, सिकर यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत पी.डी.यु.एस. सिकर विद्यापीठ संघाने गुजरात विद्यापीठ संघावर 2 गुणांनी विजय मिळविला. महर्षि दयानंद सरस्वती विद्यापीठ, अजमेर विरुध्द स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड सामन्यात महर्षि दयानंद सरस्वती विद्यापीठ संघावर स्वामी रामानंद तीर्थ विद्यीपीठ संघाने 4 गुणांनी विजय मिळविला. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर विरुध्द महाराज छत्रसाल बुंदेलखंड विद्यापीठ, छत्तरपूर यांच्यात झालेल्या सामन्यात कोल्हापूर विद्यापीठ संघाने छत्तरपूर विद्यापीठ संघावर 26 गुणांनी विजय मिळविला.

दुस-या दिवशीचे दुपारचे सत्र

स्पर्धेच्या दुस-या दिवशीच्या दुपारच्या सत्रात देवी अहिल्यादेवी विद्यापीठ, इंदौर विरुध्द महर्षि दयानंद सरस्वती विद्यापीठ, अजमेर यांच्यात झालेल्या सामन्यात अजमेर विद्यापीठ संघाने इंदौर विद्यापीठ संघाचा 46 गुणांनी पराभव केला. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती विरुध्द इंदिरा गांधी नॅशनल ट्रायबल युनिव्हर्सिटी, अमरकंटक यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत अमरावती विद्यापीठ संघाने अमरकंटक विद्यापीठ संघाचा तब्बल 72 गुणांनी पराभव केला. लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिटूट ऑफ फिजिकल एज्युकेशन, ग्वालियर विरुध्द महाराज छत्रसाल बुंदेलखंड विद्यापीठ, छत्तरपूर यांच्यात झालेल्या सामन्यात छत्तरपूर विद्यापीठ संघाने ग्वालियर संघावर 9 गुणांनी विजय मिळविला. बरकतुल्ला विद्यापीठ, भोपाळ विरुध्द गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद यांच्यात रंगलेल्या सामन्यात अहमदाबाद विद्यापीठ संघाने भोपाळ विद्यापीठ संघावर 15 गुणांनी विजय मिळविला. चारुतर विद्या मंडळ विद्यापीठ, गुजरात विरुध्द राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ, गांधीनगर (गुजरात) यांच्यात झालेल्या गांधीनगर विद्यापीठ संघाचा गुजरात विद्यापीठ संघाने 22 गुणांनी पराभव केला. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर विरुध्द युनिव्हर्सिटी ऑफ राजस्थान, जयपूर यांच्यात झालेल्या सामन्यात कोल्हापूर विद्यापीठ संघाने जयपूर विद्यापीठ संघाचा 4 गुणांनी पराभव केला. विक्रम विद्यापीठ, उजैन विरुध्द स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड यांच्यात झालेल्या सामन्यात नांदेड विद्यापीठ संघाने उज्जैन विद्यापीठ संघाचा 12 गुणांनी पराभव केला. पी.डी.यु.एस. विद्यापीठ, सिकर विरुध्द पारूल विद्यापीठ, वडोदरा (गुजरात) यांच्यात झालेल्या सामन्यात सिकर विद्यापीठ संघाने वडोदरा विद्यापीठ संघाचा 25 गुणांनी पराभव केला.

उद्या स्पर्धेचा समारोप

उद्या शुक्रवार दि. 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 4.30 वाजता अंतिम सामना झाल्यानंतर लगेच स्पर्धेचा समारोपीय कार्यक्रम संपन्न होईल. या कार्यक्रमाला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे व कुलसचिव डॉ. तुषार देशमुख प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com