नागपूर :-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पाली प्राकृत व बौद्ध अध्ययन विभागात बिलासपूरच्या गुरु घासीदास केंद्रीय विश्वविद्यालय चे प्रो डॉ विनोद रंगारी यांचे 84,000 धम्मस्कंध या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
आपल्या मार्गदर्शनामध्ये ते म्हणाले की बौद्धधम्म हा 84000 धम्मस्कंध मध्ये विभाजित आहे. हे 84 हजार धम्मस्कंध मानवी जीवनात सुख, शांती आणि बोध प्रदान करण्यासाठी बुद्धांनी आपल्या उपदेशातून व्यक्त केले आहेत. हे धम्मस्कंध जगाचे कल्याण करणारे आहेत.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष विभाग प्रमुख डॉ नीरज बोधी होते. आपले अध्यक्षीय संबोधन सादर करीत असताना डॉ नीरज बोधी म्हणाले की बुद्धांचा धम्म हा बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे. 84 हजार धम्म स्कंध मध्ये बुद्धांनी बहुजन हिताचा आणि बहुजन सुखाचा मार्ग प्रशस्त केलेला आहे. ज्याचे प्रत्येक व्यक्तीने अनुकरण करणे गरजेचे आहे. सूत्रसंचालन अशोक वाटोडे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता धम्मपालन गाथेनी झाली.