जागतिक स्मरण दिन (World Day of Remembrance) साजरा..

महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग, नागपूर परिक्षेत्र कार्यालय अंतर्गत जागतिक स्मरण दिन (World Day of Remembrance) साजरा करण्यात आला..

नागपूर – रस्ते अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या, गंभीर जखमी झालेल्या, अपघातामधे अपंगत्व प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ तसेच अपघात पिडीतांच्या कुटूंबियांच्या सांत्वनाकरीता, त्यांना मार्गदर्शनाकरीता सामाजिक जबाबबदारी म्हणुन दरवर्षी नोव्हेंबर महिन्यातील ०३ रा रविवार हा जागतिक स्मरण दिन (World Day of Remembrance) म्हणुन पाळण्यात येतो.

दि.१९/११/२०२३ रोजी जागतिक स्मरण दिन (World Day of Remembrance) पाळण्यात येत असुन महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग, नागपूर परिक्षेत्र कार्यालया अंतर्गत सदर दिनाचे औचित्य साधुन दिनांक १९/११/२०२३ ते दि.२४/११/२०२३ पर्यंत रस्ते अपघाताबाबत विविध जनजागृती कार्यकम राबविण्यात येत आहेत. सदर कार्यकमाच्या अनुषंगाने रस्ते अपघातासारख्या भिषण परिस्थितीबाबत जनतेमध्ये जनजागृती कार्यकम होणे करीता या कार्यालयाकडुन रविंद्र सिंगल, अपर पोलीस महासंचालक, (वाहतुक) महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मागदर्शनात व प्राप्त निर्देशाप्रमाणे आज दि. २१/११/२३ रोजी सकाळी १२/०० ते १६/०० वा. पर्यंत पोलीस प्रशिक्षण विद्यालय, नागपूर येथे जागतिक स्मरण दिन (World Day of Remembrance) साजरा करण्यात आला. सदर वे कार्यक्रमाकरीता विधी अधिकारी अमीत उपलोपवार, रा. नागपूर  अमेया घाटोळे, रा. नागपूर तसेच युनायटेड इंडीया इंश्युरन्स लिमीटेड, प्रादेशिक विभाग, नागपूर येथील निलांबरी मेश्राम, उपप्रबंधक,  शेखर बावने, सहा. प्रबंधक असे हजर होते त्याच प्रमाणे डॉ. राज बशीर दिवान, चेअरमन वर्ल्ड हेल्थ आयुष, ऑर्गनायझेशन नागपूर असे प्रमुख पाहुण सदर कार्यक्रमास उपस्थित होते. त्याच प्रमाणे महामार्ग पोलीस परिक्षेत्रातील कार्यरत १४ महामार्ग पोलीस मदत केंद्र येथील अधिकारी, अमलदार त्याच प्रमाणे अपघातात बळी पडलेल्या कुटुंबातील व्यक्ती व अपघात समयी सुवर्ण तासात मोलाची अपघात ग्रस्तांना मदत उपलब्ध करुन देणारे मृत्युंजय दुत असे एकूण २०० ची सदर कार्यक्रमास उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरवात यशवंत सोळंके, पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग, नागपूर यांच्या वतीने पाहुण्याचे पुष्पगुच्छ देवून व दिप प्रज्वलन करुन कार्यकमाची सुरवात करण्यात आली. त्यानंतर आजतागायत जे वाहन चालक अपघातात मृत्युमुखी पडले अश्यांना २ मिनीट सर्वांतर्फे मौन धारण करुन श्रध्दांजली अपर्ण करण्यात आली. त्यानंतर विधी अधिकारी  अमेया घाटोळे यांनी अपघात ग्रस्त झाल्यानंतर न्यायालयात सदर प्रकरणे कशी चालतात त्यातील चुका व त्यावर उपाय याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच युनायटेड इंडिया इंश्युरन्स लि. प्रादेशिक विभाग नागपूर येथील  बावणे यांनी अपघात दावे बाबत मार्गदर्शन केले त्याच प्रमाणे डॉ. दिवान यांनी अपघात झाल्यानंतर काय काळजी घ्यावी व त्यावर उपाय याबाबत माहिती दिली. त्यानंतर  यशवंत सोळंके, पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग नागपूर यांनी उपस्थितांना सदर जागतिक स्मरण दिनां निमित्त सविस्तर माहिती देवून प्रत्येक वाहन चालकाने वाहन चालवित असतांना वाहतुक नियमांचे पालन करण्यास आव्हान करीत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमांची सांगता व आभार प्रदर्शन सपोनि  तेजेंद्र मेश्राम, म.पो. केंद्र खुर्सापार यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्र संचालन पोउपनि  नरेंद्र गौरखेडे यांनी केले. तसेच पो.नि. रविंद्र दुबे, सपोनि  अरुण बकाल, पोउपनि  गजानन मोटे, पोहवा/गजानन घारोटे व समस्त महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग, नागपूर येथील अमलदारांनी सदर कार्यक्रम पार पाडण्यास मोलाचे सहकार्य केले कार्यकमाचे फोटो यासोबत संलग्न आहेत.

Next Post

‘पीएम आवास योजने’मध्ये नागपूर विभाग राज्यात प्रथम, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान

Wed Nov 22 , 2023
नागपूर :- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत राज्यात उत्कृष्ट विभाग, सर्वोत्कृष्ट जिल्हा तसेच राज्य पुरस्कृत आवास योजना आदी श्रेणींमध्ये सरस कामगिरीसाठी नागपूर विभागाला “महाआवास अभियान” पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. महाआवास अभियान पुरस्कार 2021-22 मध्ये पीएम आवास योजनेत राज्यातील सर्वोत्कृष्ट विभाग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com