नागपूर :- बेसा-बेलतरोडी परिसरात असलेल्या अमरज्योती नगर येथे भन्ते अमरज्योती धम्मदेशना महाविहारात तथागत बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव घेण्यात आला. या प्रसंगी भिक्खू संघ, क्रांतीज्योती उपासीका संघ व बुद्ध विहार उपासक संघाच्या प्रमुख उपस्थितीत बुद्ध मूर्तीची मिरवणूक काढून महाविहारात स्थापना करुन महापरित्राण पाठ करण्यात आले.
यावेळी शांतरक्षित महाथेरो व प्रियदर्शी महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत महाथेरो जीवन ज्योती ह्यांच्या माध्यमातून भिक्षु संघाचे भोजन व संघदान करण्यात आले. तसेच याप्रसंगी श्रामनेर शिबिराचा सुद्धा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाचे मुख्य आयोजन यशकायी भन्ते अमरज्योती महास्थवीर यांचे अंतिम शिष्य महास्थवीर जीवनज्योती व सुरुवातीपासूनचे सहकारी सामाजिक कार्यकर्ते व बौद्ध उपासक उत्तम शेवडे तसेच त्यांच्या न्यू कैलास नगर येथील अमरज्योती संस्थापक असलेल्या कुशीनारा बुद्ध विहाराचे संचालक डॉ भदंत धम्मोदय महस्थवीर हे प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी भिक्खू संघ मोठ्या संख्येने उपस्थित होता. त्यात प्रामुख्याने संघकीर्ती महाथेरो, सत्यानंद महाथेरो, डॉ धम्मोदय महाथेरो, धम्मांकुर महाथेरो, शांतरक्षित महाथेरो, बुद्धघोष महाथेरो, सारीपुत्त थेरो, धम्मघोष थेरो, नंद थेरो, शांतीदेव थेरो, विनय रक्षिता थेरो, भिक्षू विवेक रत्न, भिक्षू विनय कीर्ती, भिक्षू पूर्णाबोधी, भिक्षु धम्मसेवक आदी भिक्षु संघ. भिक्षु संघकीर्ती, भिक्खुणी विशाखा, भिक्खूनी आम्रपाली, भिक्खूनी संधमित्रा, भिक्खुनी पूर्णिका, भिक्खुनी सुजाता, भिक्खुनी मुदीता, भिक्खुनी प्रजापती आदी प्रामुख्याने उपस्थित होते.