कामठी तालुक्यात महा- ई -सेवा केंद्राकडून सर्रास लूट

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– दाखल्यासाठी 33 रुपये 60 पैसे शुल्क ;आकारणी मात्र मनमानी

कामठी :- महाविद्यालयीन प्रवेशासाठी आवश्यक दाखल्यासाठी कामठी तालुक्यातील बहुतांश महा ई सेवा केंद्राकडून विद्यार्थी व पालकांची अक्षरशः लूट सुरु आहे. दाखल्याची असलेली गरज ओळखून केंद्रचालकाकडून मनमानी रकमेची आकारणी सुरू असल्याची चर्चा आहे.दाखल्यासाठी शासकीय शुल्क अवघे 33 रुपये 60 पैसे असताना संबधित केंद्रचालकाकडून मात्र हजाराच्या जवळपास रक्कम आकारली जात आहे.

दहावी आणि बारावीचा निकाल लागल्याने महाविद्यालयीन प्रवेशाची सध्या प्रक्रिया सुरू आहे.महाविद्यालयीन प्रवेशासह अभियांत्रिकी ,वैद्यकीय, आयटीआय आदी प्रवेशासाठीही विद्यार्थ्यांना जात,उत्पन्न,रहीवास,राष्ट्रीयत्व आदी दाखल्याची आवश्यकता असते.वेळेत दाखले उपलब्ध झाले नाहीत तर प्रवेश नाकारला जाण्याची भीती असते यामुळे प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक दाखले काढण्यासाठी विद्यार्थी पालकांची धावपळ सुरू आहे.महा ई सेवा केंद्रातून दाखला काढण्यासाठी 33 रुपये 60 पैसे इतके शासकीय शुल्क आहे.इतकेच शुल्क संबंधित केंद्रचालकानी आकारणे बंधनकारक आहे.मात्र काही केंद्र चालकाकडून विद्यार्थ्यांची गरज ओळखून मोठी आकारणी करीत सर्रास आर्थिक लूट केल्या जात आहे.अनेकदा ही लूट दाखला वेळेत मिळावा या एकमेव कारणा करिता विद्यार्थी व पालक निमुटपणे सहन करीत आहेत.एखाद्या विद्यार्थ्याला दाखला लवकर हवा असेल तर त्याची वेगळीच किंमत केंद्र चालकाकडून निश्चित केली जाते त्यानुसार संबंधित रक्कम आकारून केंद्रचालक दाखला देत असतात यामुळे काही ठिकाणी केंद्रचालक आणि कर्मचाऱ्यांचे साटेलोटेही असते.

– पावती देणे बंधनकारक

-केंद्रचालकांव दाखल्यासाठी आकारलेल्या रकमेची पावती देणे बंधनकारक आहे.मात्र कामठी तालुक्यातील बहुतांशी केंद्रचालक पावती देत नसल्याचा अनुभव अनेक विद्यार्थी पालकांचा आहे .

– तालुका प्रशासनाने नियंत्रण ठेवण्याची गरज

-प्रवेश प्रक्रिया कालावधीत विद्यार्थी पालकांची काही केंद्र चालकाकडून लूट होत आहे यावर कामठी तालुका प्रशासनाने नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.तसेच दरम्यान प्रशासनाकडून दाखले देण्यासाठी अनेकदा विलंब होत आहे.प्रवेश कालावधीत तरी कागदपत्राची योग्य प्रकारे पूर्तता झालेल्या विद्यार्थ्यांना कमीत कमी वेळेत दाखले मिळतील यादृष्टीने प्रशासनाकडूनही प्रयत्न होण्याची गरज आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

होतकरू युवकांसाठी स्पर्धा परीक्षेच्या तयारी करीता शिष्यवृत्ती योजना

Tue Jun 11 , 2024
Ø पालकमंत्री संजय राठोड यांची संकल्पना Ø नामांकित संस्थेत स्पर्धा परिक्षेचे प्रशिक्षण Ø निवास व अन्य खर्च भागविण्यासाठी शिष्यवृत्ती यवतमाळ :- ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परिक्षेत कमी पडू नये यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून दारव्हा, दिग्रस नेर तालुक्यातील युवकांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या युवकांना नामांकित संस्थेत प्रशिक्षण दिले जाणार असून मासिक खर्च भागविण्यासाठी रोख […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com