नागपूर :- बहुजन समाज पार्टीच्या कही हम भूल न जाये या अभियानांतर्गत पुरोगामी विचारांचे प्रणेते, अस्पृश्यो धारक, स्त्रीउद्धारक, जातपात भंजक, समता उपदेशक, दक्षिणेचा प्रबुद्ध, महात्मा बसवेश्वर ह्यांची 892 वी जयंती साजरी करण्यात आली.
नागपूर जिल्हा व शहर बसपाच्या वतीने आज दक्षिण नागपुरच्या सुभेदार ले-आउट येथील महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला महाराष्ट्र प्रदेश बसपाचे मा मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हा सचिव अभिलेश वाहाने, नागपूर शहर प्रभारी इंजि सुमंत गणवीर यांच्या प्रमुख उपस्थितीत संबोधी सांगोळे या बालकाच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बसपाचे युवा नेते चंद्रशेखर कांबळे, सदानंद जामगडे, शंकर थुल, नितीन वंजारी, विलास मून, महीपाल सांगोळे, दक्षिण नागपूर विधानसभेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, मध्य नागपूर विधानसभेचे अध्यक्ष प्रवीण पाटील, दक्षिण नागपूर चे प्रभारी सुरज येवले, ओमप्रकाश शेवाळे, जतीन गेडाम, शामराव तिरपुडे, संभाजी लोखंडे, आदि बसपाचे जिल्हा, शहर, विधानसभा, सेक्टर, वार्ड, बूथ स्तरावरील पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.