कल्टीवेटर चोरी करणारा आरोपी जेरबंद

नागपुर – पोलीस स्टेशन रामटेक अंतर्गत मौजा नगरधन 10 किमी दक्षिण येथे दिनांक 20/06/2022 चे दुपारी 12.00 वा ते 12.15 वा दरम्यान फिर्यादी नामे शशिकांत विठोबा गायधने 52 वर्ष रा. नगरधन यांनी त्यांचा कल्टीवेटर आपल्या बहिनीचे घरी ठेवला होता. यातील अनोळखी आरोपीने फिर्यादीचे भाचीस विश्सावत घेवुन लबाडीने सदर कल्टीवेटर घेवुन गेल्याने पो स्टे रामटेक येथे अप क्र 350/22 कलम 406 भादवि चा गुन्हा नोंद करून तपासात होता.
सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत असतांना दि 22.06.22 रोजी मिळालेल्या गोपनिय माहीतीवरून चाचेर येथे राहणारा आरोपी नामे- संदीप शंकर वाघमारे वय 30 वर्ष, रा. चाचेर यास ताब्यात घेवुन सखोल विचारपुस केली असता त्याने त्याचा लाल रंगाचा सोनालिका कपंनीचा विना नंबरचा ट्रॅक्टर वापरून लबाडीने फिर्यादीचा कल्टीवेटर घेवुन गेल्याचे सांगितल्याने त्याचा लाल ट्रॅक्टर कि. 2,30,000/-रू. व कल्टीवेटर कि 20,000/-रू. असा एकुण 2,50,000/-रू. चा मुद्देमाल जप्त करून पुढील कार्यवाही करीता पोस्टे रामटेक चे ताब्यात दिले.
सदरची कारवाई नागपुर ग्रामीण चे पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, अपर पोलीस अधिक्षक  राहुल माकणीकर, यांचे आदेशाने स्थानीक गून्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे मार्ग दर्शनाखाली सफौ चंद्रशेखर गडेकर पोना अमोल वाघ, रोहन डाखोरे, चालक अमोल कुथे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण यांचे पथकान केली आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!