धापेवाडा येथील बंद घरात चालणाऱ्या जुगार अड्‌ड्यावर पोलीसांची धाड एकुण १,२३,७००/-रू. चा मुद्देमाल जप्त

– उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सावनेर विभाग  यांची कारवाई

सावनेर :-दिनांक २२/०१/२०२४ रोजी मौजा धापेवाडा येथे वार्ड क्र. ०४ गजानन मंदीराच्या मागे उमाशंकर बहादुरे यांचे घरात काही ईसम जुगार खेळ खेळत असल्याची माहीती  अनिल मास्के (भा.पो.से.) सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर यांना मिळाल्यावरून त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक राकेश साखरकर यांना तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सावनेर येथिल स्टॉफ पाठवुन धापेवाडा येथे आरोपी उमाशंकर बहादुरे यांचे घरी जुगारबाबत रेड केली असता आरोपीचे बंद घरामध्ये आरोपी क्र. १) आरोपी पवन विष्णुजी दुनेदार वय २६ वर्ष रा. वार्ड क्र. ०३ भापेवाडा २) धनराज देवनाथ वरवड वय ४० वर्ष रा. वार्ड क्र. ०२ धापेवाडा ३) सचिन गुलाबराव सोनटक्के वय ४० वर्ष रा. सोनापार ता. कळमेश्वर ४) पुरूषोत्तम भाउरावजी ठाकरे वय ४० वर्ष रा. वार्ड क्र. ०४ धापेवाडा ५) कार्तीक भिमराव तभाने वय २८ वर्ष रा. वार्ड क्र. ०४ धापेवाडा ६) सुनिल मधुकर ढोले वय ४५ वर्ष रा. वार्ड क्र. ०३ धापेवाडा ७) निखील माधोराव पावनकर वय २९ वर्ष रा. वार्ड क्र. ०५ धापेवाडा ८) श्रीकांत वासुदेव ठाकरे वय ४५ वर्ष रा. वार्ड क्र. ०४ धापेवाडा ९) उमाशंकर वसंता बहादुरे वय ४५ वर्ष रा. वार्ड क्र. ०४ धापेवाडा हे तासपत्त्यांवर पैशाचे हारजीतचा जुगार खेळ खेळतांना मिळुन आल्याने त्यांचे ताब्यातुन एकुण नगदी ५३१४०/- रू. व वेगवेगळ्या कंपनीचे मोवाईल एकुण किंमती ७०५००/- रू. व ५२ तासपत्ते आणि एक सीलबंद तासपत्त्यांची कॅट किंमती ६०/-रु. असा एकुण १,२३,७००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही हर्ष पोद्दार (भा.पो.से.) पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण, संदीप पखाले अपर पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण यांचे मार्गदर्शनात अनिल म्हस्के (भा.पो.से.) सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर, सहायक पोलीस निरीक्षक राकेश साखरकर पो.स्टे. केळवद, सहायक फौजदार संजय उकंडे, महिला पोलीस हवालदार संगिता कोवे, पोलीस अंमलदार नितेश पुसाम, धोंडुतात्या देवकते, महिला पोलीस अंमलदार अश्विनी वांढरे यांनी केलेली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वर्षभरात दिडशे आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Wed Jan 24 , 2024
– नक्षलग्रस्त भागातून आरोपी गजाआड – 402 गुन्ह्यातील मुद्देमाल केला परत नागपूर :- रेल्वे म्हणजे अद्भूत विश्व. या विश्वात सारेच हरवून जातात. धड धड करत येणार्‍या गाडीत प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. आरोपी याच संधीचा फायदा घेत प्रवाशांच्या मौल्यावान वस्तू पळवितात. प्रवाशांचे सामान चोरणार्‍या टोळ्या भारतीय रेल्वेत सक्रीय आहेत. मात्र, लोहमार्ग नागपूर पोलिसांच्या पथकाने देशाच्या विविध राज्यात जावून अनेक टोळ्यांचे म्होरके […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com