लाखो प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या निष्ठेसमोर नतमस्तक! – चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

– मोठ्या यशाला गवसणी घालू; 4 जूनला जल्लोष करू

मुंबई :- लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या व महाराष्ट्रातील अंतिम टप्प्याचे मतदान सोमवारी (ता.20) पार पडले. मतदान झाल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आभार व्यक्त करणारे पत्र भाजपा कार्यकर्त्यांना लिहिले आहे. घरदार विसरून, अथक परिश्रम करून कोट्यवधी मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांचा सार्थ अभिमान त्यांनी व्यक्त केला आहे.

भाजपा कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रात बावनकुळे यांनी, भाजपा कार्यकर्ते प्रत्येक गाव-खेड्यापर्यंत मोदीच्या विकसित भारताचं स्वप्न घेऊन पोहोचल्याचा उल्लेख केला आहे. बावनकुळे पत्रातून आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, या निवडणुकीचा प्रवास बूथ समित्यांपासून सुरू झाला आणि तो लाखोंच्या सभांपर्यंत विस्तारत गेला. बूथ समिती, शक्ती केंद्र प्रमुख, विस्तारक, सुपर वॉरियर्स, सोशल मीडिया संयोजक यांच्यासह हजारो कार्यकर्ते, संघटनेतील पदाधिकारी यांच्यासह माझे विधिमंडळातील सर्व आजी-माजी सहकारी निवडणुकीच्या रिंगणात कार्यरत होते, असा उल्लेखही त्यांनी पत्रातून केला आहे.

राष्ट्रप्रेमाने भारलेल्या लाखो कार्यकर्त्यांची अखंड मेहनत हाच आपल्या पक्षाच्या यशाचा बलदंड पाया आहे, भाजपाचे कार्यकर्ते अविश्रांत राबल्यामुळे निवडणुकीत मोठ्या यशाला गवसणी घालणार असून 4 जूनला सर्वजण मिळून जल्लोष करू आणि महायुतीचा झेंडा अभिमानाने फडकवू, असा विश्वासही त्यांनी पत्रातून व्यक्त केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कापसाच्या मूल्यवर्धनातून नागपूरचे शेतकरी ‘स्मार्ट’

Tue May 21 , 2024
नागपूर :- गेल्या खरीप हंगामात कापसापासून गाठी तयार करण्यात अपयश आले. त्यानंतरही हार न मानता स्मार्ट प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी प्रयत्नात सातत्य राखले. त्याच्याच परिणामी यंदाच्या हंगामात तब्बल ४९१ गाठी तयार करण्यात यश आले आहे. राज्यात कापसाच्या मूल्यवर्धनास प्रोत्साहन मिळावे याकरिता बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत स्मार्ट कॉटन योजना राबविण्यात येत आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना कापसावर प्रक्रिया करीत त्यापासून गाठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!