रामटेके – यावर्षी देखील दुरून दुरून पंच क्रोशितून भाविक शोभायात्रा टिपूर पौर्णिमा निमित्त रामनगरीत.
अँकर – रामटेकचे सांस्कृतिक व आध्यात्मिक वैभव असलेली वैकुंठ चतुर्दशी आणि त्रिपुरी पौर्णिमेच्या शुभ पर्वावर मागील 38 वर्षांपासून सातत्याने शोभायात्रा मोठ्या उत्साहात निघते.या वर्षी रामटेक येथील शोभायात्रा अठरा भुजा गणेश मंदिर येथून निघून नगरभ्रमन करून गांधी चौक मार्गे लंबे हनुमान मंदिर जवळ शोभयात्रेचे समापन झाले.
शोभायात्रा प्रसंगी आमदार आशिष जयस्वाल ,भारतीय जनसेवा मंडळाचे अध्यक्ष पर्यटक मित्र चंद्र्पाल चौकसे, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी,उदयसिंग यादव,
नगराध्यक्ष दिलीप देशमुख, जिल्हा परिषद सदस्य दुधराम सव्वालाखे , नगर परिषद उपाध्यक्ष आलोक मानकर , तुकाराम बाबा, समाजसेवक गोपी कोल्लेपरा ,
सुनील रावत ,मिताराम सव्वालाखे , डॉ. रामसिंग सहारे , पी.टी.रघुवंशी,बबलू दुधबर्वे , रामचंद्र आडमाची आदींची उपस्थिती होती. उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते,तहसीलदार बाळासाहेब मस्के ,मुख्याधिकारी हर्षल गायकवाड ,पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्र्वर ,पोलिस उपनिरीक्षक विवेक सोनवणे सह प्रशासकीय अधिकारी यांचे प्रमुख मार्गदर्शनात शोभायात्राचा खंड न पडता शोभायात्रा निघाली हे विशेष. ठिकठिकाणी सुशोभित रांगोळी काढण्यात आली होती, ,सजावट गेट लावण्यात आले होते. राम भक्त गण याचे द्वारे महाप्रसादचे वितरण करण्यात आले होते. खंड पडायला नको व कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता हया वर्षी शोभायात्रा करिता रामटेक वासियांच्या आग्रहास्तव 5 झाक्यांनाच उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी बैठकीत परवानगी दिली गेली होती . 5 ही झाक्यांना पुरस्कार राशी देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावर्षी देखील दुरून दुरून पंच क्रोशितून भाविक कार्तिक पौर्णिमेला टिपूर पौर्णिमा व मंडई करिता आले होते. घरोघरी पाहुणे या दिवसात आलेले आहेत. रामटेक वासियांची खरी दिवाळी हीच असते.रामटेक ला जणू जत्रेचे स्वरूप आले आहे. रामटेक वासिया करिता हे दिवस मोठ्या आनंददायी व मोठ्या उत्साहाचे असतात .रामटेक वसियांची खरी दिवाळी हीच असते.एकंदरीत रामनगरीला जत्रेचे स्वरूप आले होते.