संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या घोरपड मार्गावरील नाटकर टी पॉईंट मार्गावर बोलेरो पिकअप च्या चालकाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या तीन सीटर ऑटो ला दिलेल्या जबर धडकेत ऑटोमध्ये बसलेला ऑटो चालकचा मित्र गंभीर रित्या जख्मि झाल्याची घटना गतरात्री 9 वाजे दरम्यान घडली असून यासंदर्भात फिर्यादी ऑटो चालक सौरभ शाहू वय 21 वर्षे रा पारडी ,नागपूर ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून आरोपी बोलेरो पिकअप चालक निरंजन परदेशी वय 35 वर्षे रा रविदास नगर,कामठी विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर जख्मि हे ऑटोचालकाच्या तीन सीटर ऑटो क्र एम एच 49 बी एम 5970 ने पारशिवणी तालुक्यातील घोगरा चा महादेव तिर्थस्थळी भेट देऊन घोरपड मार्गे नागपूर ला जात असता विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो पिकअप क्र एम एच 40 एन 3652 च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजी पणाने चालवून ऑटो ला दिलेल्या जोरदार धडकेत घडलेल्या गंभीर अपघातात ऑटो मध्ये बसलेला ऑटो चालक चा मित्र गंभीर रित्या जख्मि झाला असून सुदैवाने जीवितहानी टळली. पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.