महाविद्यालयां कडून विद्यार्थीची टी सी साठी अडवणुक

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– आधी शिष्यवृत्तीचे पैसे जमा करा

कामठी :- पदवी आणि पदवीत्तेर परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थीना महाविद्यालया तर्फे क्लियरंस च्या नावाखाली टीसी देण्यास मनाई करण्यात येत आहे.

येथील सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयात पदवी उत्तीर्ण विद्यार्थीना आधी शिष्यवृत्तीच्या फरकाची रक्कम जमा करा तरच टी सी साठी आवश्यक क्लियरंस मिळेल असे फरमान जारी करण्यात आले आहे फरकाची रक्कम 1500 ते 4000 दरम्यान आहे,काही विद्यार्थीनी रक्कम भरुन टी सी प्राप्त केली तर अनेक विद्यार्थी पैश्या अभावी हतबल झाले आहेत.

टी सी मिळत नसल्याने हजारो विद्यार्थी चे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भिति आहे

याबाबत भाजपा कामठी शहर महामंत्री उज्वल रायबोले यांच्या नेतृत्वात निवेदन प्राचार्य डॉ विनय चव्हाण यांना देण्यात आले व शिष्यवृत्ती रक्कमेच्या फरका अभावी कुणा ही विद्यार्थीची टी सी रोखण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली,भाजपा शिष्टमंडळा समक्ष प्राचार्य डॉ विनय चव्हाण आणि समाजकल्याण विभागा चे सह आयुक्त सिद्धार्थ वानखेड़े यांच्या दरम्यान मोबाईल वर चर्चा करण्यात येऊन मध्यम मार्ग काढण्याची शक्यता तपासण्यात आली शिष्टमंडळात भाजपा अनुसूचित जाती आघाडी कामठी शहर अध्यक्ष विक्की बोंबले तसेच जितेंद्र खोब्रागडे, अरविंद चवडे, अवि गायकवाड़, शंकर चवरे, दिनेश खेडकर यांचा समावेश होता.

या निवेदनाची प्रत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सिनेट सदस्य सुनील पुडके, प्रथमेश फुलेकर यांना देखील देण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मेंजर ध्यानचंद जयंती (खेल दिवस) उत्साहपूर्वक मनाई गई

Tue Aug 29 , 2023
राजनांदगांव :- खेल एवं युवा कल्याण विभाग, एवं जिला हॉकी संघ राजनांदगांव तथा समस्त खेल संघ के संयुक्त तत्वाधान में हॉकी के जादूगर मेजर ध्यानचंद जी की जयंती खेल दिवस के रूप में नगर के खेल प्रमियो द्वारा उत्सहपूर्वक मनाई गई इस अवसर पर सुबह 7ः30 बजे अंतर्राष्ट्रीय हॉकी स्टेडियम से समस्त खेल से जुडे खिलाडियों द्वारा रैली निकाली गई […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com