संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी
– काँग्रेसचा गढ आला पण सिंह गेला
कामठी ता प्र 6 – नागपूर जिल्ह्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या येरखेडा ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भाजप समर्थित गटाच्या मंदा प्रमोद महलले पाटील यांनी काँग्रेस समर्थक गटाच्या नाजीस परविन नसरुद्दीन यांच्या चुरशीच्या लढतीत एकमताने पराभव करून विजय संपादन केला . 18 डिसेंबरला झालेल्या येरखेडा ग्रा प च्या 17 सदस्य व सरपंच पदाच्या निवडणुकीत काँग्रेस समर्थित गटाच्या सरिता रंगारी या विजयी झाल्या होत्या व त्यांच्यासह 8 सदस्य निवडून आले होते . तर उर्वरित भाजप चे होते.सरपंच पदाच्या झालेल्या निवडणुकीत भाजप समर्पित गटाच्या मंदा प्रमोद महाले पाटील यांनी काँग्रेस समर्पित गटाच्या नाजीस परवीन नसरुद्दीन यांचा एकमताने पराभव करून विजय संपादन केला. प्रमोद मंदा महल्ले यांना 9 तर नाजीस परविन नसरुद्दीन यांना आठ मते मिळाली .काँग्रेसमधील सदस्य पैकी एका सदस्याने क्रॉस वोटिंग केल्याने मंदा प्रमोद महलले यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला. त्यामुळे येरखेडा ग्रामपंचायत मध्ये काँग्रेसचा गढ आला पण सिंह गेला अशी स्थिती झाल्याचे दिसून येत आहे .निवडणूक निर्णय पिठासीनअधिकारी म्हणून नवनिर्वाचित सरपंच सरिता रंगारी यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली असून निवडणूक निरीक्षक म्हणून कामठी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी संदीप बोरकर, ग्रामविकास अधिकारी जितेंद्र ढवळे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. निवडणुकी दरम्यान काही काळाकरिता तणाव झाल्याने नवीन कामठीचे ठाणेदार भरत शिरसागर सहकाऱ्यांसह मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाल्याने तणाव कमी झाला. येरखेडा ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित उपसरपंच मंदा प्रमोद महाले पाटील यांचे प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर, अनिल निधान ,जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे, माजी सरपंच मंगला कारेमोरे ,माजी सरपंच मनीष कारेमोरे ,नरेश मोहबे , आचल तिरपुडे ,प्रिया दुपारे, ज्योती घडले, राजश्री दिवले , कुलदीप पाटील ,अनिल भोयर ,कामठी पंचायत समितीचे माजी उपसभापती देवेंद्र गवते ,प्रमोद महाले पाटील, सुषमा राखडे ,सरिता भोयर , मोनिका शेंडे , सुषमा तलमले, राजेश पिपरेवाल आदींनी अभिनंदन केले.