बेघरांना ब्लॅंकेट वाटप,  बाबा आमटेंच्या जयंती निमित्ताने स्तृप उपक्रम.

नागपूर : गरिबांना वाली नसतो, याला अपवाद ठरवणारा एक स्तुत्य उपक्रम नुकताच नागपूर रेल्वे स्थानकावर राबविण्यात आला. यात कोरोना वारिअर योद्धा पुरस्कार प्राप्त नागपूर चा हिरो मंगेश झाडे व सामाजिक कार्यकर्त्या यांच्या नेतृत्वात कॉटन मार्केट जवळील रेल्वे स्टेशन वरील 42 बेघर निरक्षित रस्त्यावरच जीवन जगणारेणाऱ्यांना बँकेट्स चादर, मास्क चे वाटप करण्यात आले.

बेघरन सोबतच, मोकाट कुत्रे व इतर प्राण्यांनाही बिस्कुट व पशुखाद्य देण्यात आले. पद्मश्री बाबा आमटे यांच्या कार्यक्रमापासून प्रेरणा घेऊन समाजसेवा करीत असल्याचे मंगेश झाडे यांनी सांगितले. उपक्रमात मोहक चावला, सुरेश विश्वकर्मा, राकेश देसाई, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी रेल्वे स्टेशनवर सहकार्य केले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com