नागपूर :- भारतीय जनता पार्टीचा जाहिरनामा तयार करण्यासाठी जनतेमधून सूचना मागविण्यात येत आहे. या अंतर्गत ‘माझ्या सूचना, माझा जाहिरनामा’ , ‘नागरिकांच्या सूचना , भाजप चा जाहीरनामा’ अभियान राबविण्यात येत आहे. शुक्रवारी (ता.३०) भारतीय जनता पार्टी नागपूरच्या जाहिरनामा समितीची दुसरी बैठक पार पडली.
भारतीय जनता पार्टी विदर्भ कार्यालयामध्ये संपन्न झालेल्या जाहिरनामा समितीच्या बैठकीमध्ये प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम, समितीचे मुख्य संयोजक माजी आमदार गिरीश व्यास, जयप्रकाश गुप्ता, माजी महापौर दयाशंकर तिवारी, आर्थिक प्रकोष्ट महाराष्ट्र प्रदेशचे संयोजक सीए मिलिंद कानडे, बीएमए चे अध्यक्ष नितीन लोणकर, एमआय चे अध्यक्ष कॅप्टन रणधीर, व्हीएमआय चे गिरधारी मंत्री, सीए माधव विचोरे, जयप्रकाश पारेख, व्हीटीए चे तेजिंदर सिंग रेणू, अश्विन मेहाडिया, आर्किटेक्ट नवल झवर आदी उपस्थित होते.
नागपूर लोकसभा मतदार संघासाठी तसेच राष्ट्रीय स्तरावरील कार्यासाठी समाजातील विविध क्षेत्रातील नागरिकांमधून सूचना मागवून त्याआधारे भारतीय जनता पार्टीचा जाहिरनामा तयार केला जाणार आहे. नागरिकांना करण्यात येत असलेल्या आवाहनाला देखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे. समाजातील विविध व्यावसायिक, सीए, वास्तुविशारद अशा विविध क्षेत्रातील नागरिकांनी आतापर्यंत आपल्या सूचना नोंदविल्या आहेत.
जाहिरनामा तयार करण्यासाठी आमंत्रित सूचनांकरिता भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात बॉक्स ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी नागपूर लोकसभा मतदार संघ तसेच देशाच्या सर्वांगिण विकासामध्ये भर घालू शकणा-या महत्वाच्या सूचना बॉक्समध्ये टाकाव्यात, असे आवाहन भाजपा नागपूर शहर तर्फे करण्यात येत आहे.