संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- श्री हनुमान मंदिर देवस्थान खदान रोड कांद्री येथे आरती समुह कांद्री ग्रामस्था व्दारे पुजा अर्चना व कढईचा प्रसाद वितरण करून नागपंचमी उत्सव साजरा करण्यात आला.
शुक्रवार (दि.९) ऑगस्ट २०२४ ला श्री हनुमान मंदिर देवस्थान खदान रोड कांद्री येथे नागपंचमी सणा निमित्य सकाळी ६ वाजता शिवपिंड व नाग मुर्तीचे विधिवत पुजा अर्चना आणि दुपारी ३ वा. शिवशक्ती डाहाका मंडळ कांद्री शाहीर विक्रम वांढरे, शालीक शेंडे, गिरधर बावणे, आकाश बावनकुळे, प्रफुल्ल भन्नारे, धर्मराज आपुरकर यांनी नागव्दार पहाडी वर, नागठाणा, आणि शिव शंकरावर डाहाक द्वारे गायन केले.तदंतर आरती करून कढईचा प्रसाद वितरण करून नागपंचमी सण उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास शिवाजी चकोले, चंद्रशेखर बावनकुळे, विजय आखरे, सुरेश उमक, अशोक किरपान, अरुण मानकर, सुनिल प्रजापती, सेवक भोंडे, राजेश पोटभरे, प्रविण हिंगे, प्रविण आखरे आदी सह समस्त नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता आयोजक वासुदेव आखरे, वामन देशमुख, विजय आखरे, प्रविण हिंगे, मनोज बाबु, रामा हिवरकर आणि समस्त आरती समुह ग्रामस्थानी सहकार्य केले.