मदनदास देवी यांच्या निधनाने राष्ट्र समर्पित ध्यास पर्वाची समाप्ती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई :- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटनमंत्री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहसरकार्यवाह मदनदास देवी यांच्या निधनाने एका ध्यास पर्वाची समाप्ती झाली, अशा शब्दांत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

बावनकुळे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, ‘राष्ट्राय स्वाहा ‘ असा मंत्र जपत त्यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्रसेवा आणि संघकार्याला समर्पित केले होते. विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून महाविद्यालय ते विद्यापीठ स्तरावर नि:स्वार्थ भावनेने समाजकार्य करणाऱ्या युवकांच्या अनेक पिढया त्यांनी घडवल्या. राष्ट्रभक्तीचा झरा असलेले त्यांचे व्यक्तिमत्व सर्व समाजासाठी प्रेरणादायी होते. अशा ध्येयासक्त व्यक्तिमत्वाला विनम्र श्रद्धांजली, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सेवानिवृत्त लष्करातील जवानाचे महिलेशी गैरवर्तन

Mon Jul 24 , 2023
– आमल्याहून पकडले आरोपीला – संघमित्रा एक्सप्रेसमध्ये खळबळhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 नागपूर :- सेवा निवृत्त लष्करी जवानाने झोपेत असलेल्या महिलेशी अश्लील चाळे केले. आरडा ओरड होताच पतीसह डब्यातील प्रवासी गोळा झाले. प्रकरणाची माहिती टीसीच्या माध्यमातून रेल्वे नियंत्रण कक्षाला देण्यात आली. पुढील स्थानकावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. अशोकसिंग परिहार (47), रा. ग्वॉल्हेर असे अटकेतील आरोपीचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com