धावत्या रेल्वेखाली डोके ठेवून अनोळखी तरुणाची आत्महत्या

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक कामठी रेल्वे स्टेशन हद्दीत येणाऱ्या रेल्वे की. मी .नं. 1116/15 मार्गाहुन धावत असलेल्या रेल्वे गाडीसमोर डोके ठेवून अनोळखी तरुणाने आत्महत्या केल्याची घटना गतरात्री साडे नऊ वाजता घडली असून आत्महत्येचे कारण अजूनही कळू न शकल्याने आत्महत्येचे कारण व अनोळखी तरुणाची ओळख अजूनही गुलदस्त्यात आहे.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह कामठीच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.अनोळखी मृतदेहाची ओळख अंदाजे 28 वर्षे असून उंची 5 फूट पाच इंच आहे ,रंग गोरा, बांधा सळपातळ , तर अंगात सिमेंट डार्क रंगाचे शर्ट व फुल बाईचे निळ्या रंगाचे फुलप्यान्ट घातले आहे. तसेच त्याच्या हातावर इंग्रजी मध्ये R.B.गोंदलेले आहे.

पोलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे तसेच उपरोक्त नमूद वर्णनाचा व्यक्ती ओळखीचा वाटल्यास रेल्वे पोलीस उपनिरीक्षक श्रीधर पेंधोर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

NewsToday24x7

Next Post

मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांच्या हस्ते RRR केंद्राचे लोकार्पण

Sat May 20 , 2023
– नागरिकांनी रिड्युस, रियूज व रिसायकल वर भर द्यावा: आयुक्तांचे आवाहन नागपूर :- केंद्र शासनाच्या ‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोन निहाय ३८ ठिकाणी रिड्युस, रियूज व रिसायकल अर्थात RRR केंद्र सुरू करण्यात आले आहेत. यातील धरमपेठ झोन कार्यालय येथील केंद्राचे लोकार्पण मनपाचे आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते करण्यात आले. नागरिकांनी आपल्या घरातील निरुपयोगी […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com