भाजप शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी केली ऑटोरिक्षा आघाडीची घोषणा

ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या पुढाकाराने आघाडीची स्थापना

नागपूर :- भारतीय जनता पार्टी शहर ऑटोरिक्षा आघाडीची सोमवारी (ता.२३) शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी घोषणा केली. भाजपा प्रदेश सचिव ॲड्. धर्मपाल मेश्राम यांनी ऑटोरिक्षा आघाडी स्थापन करण्यासाठी विशेष पुढाकार घेतला. ॲड. मेश्राम यांच्या पुढाकारानंतर भारतीय जनता पक्षाद्वारे आघाडीची घोषणा करण्यात आली.

पक्षाद्वारे घोषित करण्यात आलेल्या ऑटारिक्षा आघाडीचे फलक शहरातील सर्व ऑटोरिक्षा स्टँडवर लावण्यात येणार आहेत. ऑटोचालकांच्या विविध समस्या, त्यांचे आरोग्य, मुलांचे शिक्षण, आयुर्विमा या सर्वांसाठी भारतीय जनता पार्टी ऑटोरिक्षा आघाडी पुढाकार घेण्याचे आवाहन ह्यावेळी भाजप शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके ह्यांनी केले.

भारतीय जनता पार्टीच्या ऑटोरिक्षा आघाडीच्या अध्यक्षपदी जीवन तायवाडे यांची निवड करण्यात आली आहे. तर कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी पल्लवी सोनोने यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. प्रवीण बनारसे आघाडीचे संपर्क प्रमुख म्हणून काम पाहतील. याशिवाय आघाडीच्या कार्यकारिणीमध्ये ४ महामंत्री, ६ नगर संपर्क प्रमुख, २८ उपाध्यक्ष, १५ मंत्री आणि २७ कार्यकारिणी सदस्य असे एकूण ८२ सदस्यांचा समावेश आहे.

कार्यकारिणीच्या पुढील कार्यासाठी भाजप प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम यांनी शुभेच्छा दिल्या.

ह्या प्रसंगी शहर भाजप महामंत्री संजय बंगाले, संघटनमंत्री सुनील मित्रा ह्यांनी समयोचित मार्गदर्शन केले. संचालन रामभाऊ आंबुलकर यांनी तर प्रास्ताविक नवनियुक्त शहर ॲाटोरिक्षा आघाडी अध्यक्ष जीवन तायवाडे ह्यांनी केले. आभार देबब्रत विश्वास महामंत्री यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

NDS cracks whip against 3184 vendors flouting hygiene, cleanliness norms

Tue Jan 24 , 2023
Rs. 12,73,600 fine recovered between October and January Nuisance Detection Squad’s campaign continues unabated  Nagpur : Nagpur Municipal Corporation is fully working to make Nagpur city clean and beautiful. Accordingly, strict action is being taken by the Nagpur Municipal Corporation against those who spread filth in public places and deface the locality and spread nuisance. According to the directives of […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com