– बहुजन राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा 6 मे रोजी 102 वा स्मृती दिवस आहे.
नागपूर :- बसपाच्या कही हम भूल न जाये या राष्ट्रीय अभियानांतर्गत सोमवार 6 मे रोजी सकाळी 11 वाजता मनपा चे नियोजित शाहू स्मारक स्थळ मेडिकल चौक येथे बसपाचे नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
प्रदेश, जिल्हा, शहर, विधानसभा, सेक्टर व बुथ स्तरावरील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी या स्मृतिदिनाच्या अभिवादन सोहळ्याला उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश बसपाचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केले आहे.