महायुतीचे भाजप उमेदवार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

-कामठी विधानसभा मतदार संघ निवडणुकीसाठी 29 उमेदवारांनी 33 उमेदवारी अर्ज केले सादर

कामठी ता प्र 29:-भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या 20 नोव्हेंबर ला होऊ घातलेल्या कामठी मौदा विधानसभा निवडणूक कार्यक्रमानुसार 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर पर्यंत नामांकन अर्ज दाखल करायचे होते त्यानुसार आज नामांकन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महायुती तर्फे भाजप च्या वतीने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी आमदार टेकचंद सावरकर,माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे , कृपाल तुमाणे,माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, माजी आमदार आशिष जैस्वाल, राष्ट्रवादी चे बाबा गुजर आदींच्या मुख्य उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गोसावी तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार गणेश जगदाडे व तहसीलदार दत्तात्रय निंबाडकर यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला.. तसेच आजपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची संख्या 29 झाली असून त्यामध्ये महाविकास आघाडीच्या कांग्रेस चे सुरेश भाऊ भोयर ,महायुती भाजप चे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे, बसपा चे विक्रांत मेश्राम,वंचीत बहुजन आघाडी चे प्रफुल मानके, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी चे राजेश काकडे, अपक्ष उमेदवार दीपक मुळे,राष्ट्रीय समाज पक्ष चे नफिस शेख, आझाद समाज पार्टी(कांशीराम) चे प्रशांत बन्सोड,भीम सेना चे नितीन सहारे,एमआयएम आय एम (आय एम क्यू)चे नावेद अखतर,मनसे चे गणेश आनंद मुदलियार,आर पी आय डेमोक्रॅटिक चे जगदीश वाडीभस्मे,बळीराजा पार्टी चे गजानन लोखंडे, जय विदर्भ पार्टी चे प्रशांत नखाते, आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया चे विजय जगन डोंगरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे अमोल वानखेडे, अपक्ष उमेदवारात राजू वैद्य,रघुनाश सहारे,किशोर गेडाम,मनोज रंगारी,गणेश पाटील,सचिन पाटील, सलील अन्सारी,बंटी झलावणे,फैय्याज अन्सारी, सुलेमान अब्बास चिराग अली,नरेंद्र दत्त गौर,फिरोज अहमद अन्सारीचा, शौकत अली बागवान अली समावेश आहे.

आज महायुतीचे भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज 20 हजार शुभचिंतकांच्या संख्येतील गर्दीत शंखनाद काढून उमेदवारी अर्ज भरण्याची काढलेली मिरवणूक ही नयनरम्य असून विरोधकांना विचार करणारी ठरली. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मिरवणूक चा शुभारंभ केला.याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,माजी राज्यमंत्री सुलेखाताई कुंभारे,माजी आमदार टेकचंद सावरकर यासह भाजप चे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शिंदे गटाच्या नेत्याचं शिवसेना पक्षाबाबतचं विधान वादाच्या भोवऱ्यात

Wed Oct 30 , 2024
मुंबई :- राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. ऐन निवडणूक काळात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने स्वत : च्याच पक्षाबाबत केलेलं विधान आता वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. शिवसेना ही सुंदर स्त्री आहे. पण गळ्यात मंगळसूत्र नसल्यामुळे आज तिचे लचके तोडले जात आहेत, असं विधान शिंदे गटाचे नेते सदानंद चव्हाण यांनी केलं आहे. सदानंद चव्हाण हे माजी आमदार आहेत. शिवसेनेच्या माजी आमदाराने शिवसेनेची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!