नागपूर :- नागपूर शहरातील तरुणी ॲड. श्रीया ठाकरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. यासह सोशल मीडिया विभागातील “लीगल सेल सहसमन्वयक” म्हणून सुद्धा जबाबदारी त्यांचाकडे देण्यात आली आहे. श्रीया ठाकरे सोशल मीडियावर सक्रीय असून काँग्रेसच्या त्यांचे या क्षेत्रातील उत्तम काम पाहता पाहता त्यांचावर कमी वयात काँग्रेस पक्षातर्फे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
या जबाबदारीसाठी श्रीया ठाकरे यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विभागाच्या अध्यक्षा सुप्रिया श्रीनेत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सोशल मीडिया विभागाचे महाराष्ट्र प्रभारी नितीन अग्रवाल, सोशल मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांच्यासह पक्षातील सर्व वरिष्ठांचे आभार व्यक्त केले.