आईचा हात, पत्नीची साथ, जनतेचा आशिर्वाद घेत फडणवीसांनी मतदानाचा हक्क बजावला!

नागपूर:- महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान आज पार पडतंय. नागपुरातही आज मतदान आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्नी आणि आईसमवेत मतदानाचा हक्क बजावला. फडणवीसांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. फडणवीस आपल्या वृद्ध आईचा हात धरून मतदानकेंद्रात घेऊन जाताना दिसत आहेत. फडणवीसांचा राजकारणातला सुसंस्कृतपणा नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणाने पाहिलाय, पण आज आईसोबतचं फडणवीसांचं संवेदनशील वर्तन पाहून एक मुलगा म्हणून राजकारणाच्या पलीकडचे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला पाहायला मिळाले.

देवेंद्र फडणवीस सध्या प्रचंड व्यस्त आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांच्या सभा आणि भेटीगाठींचं सत्र सुरु आहे. महायुतीची महाराष्ट्रातली संपूर्ण कमानच फडणीसांच्या खांद्यावर आहे त्यामुळे फडणवीसांची प्रचारसभा व्हावी अशी महायुतीतल्या प्रत्येक उमेदवाराची इच्छा आहे. फडणवीसांच्या १०० हुन अधिक सभा होणार आहेत. या सर्व व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढूनही फडणवीस नागपूरला पोहोचले. त्यांनी मतदानकेंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही होत्या. पण सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबत असलेल्या फडणवीसांच्या आई यांनी.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

Fri Apr 19 , 2024
– लोकशाही बळकटीकरणासाठी मतदान करा – ना.सुधीर मुनगंटीवार – पाचही जागेवर भाजप महायुतीचा विजय निश्चित चंद्रपूर :- चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले गट), पिरीपा (कवाडे गट), रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी आज दुपारी रांगेमध्ये लागून सहकुटुंब चंद्रपुरातील सिटी हायस्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पत्नी सपना मुनगंटीवार, जावई डॉ. तन्मय बिडवई,मुलगी डॉ. शलाका […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com