नागपूर :-बनवाडी येथील जिल्हा परिषद प्रायमरी शाळेत स्वाती व निलेश कांबळे यांनी आपल्या स्वानिका नावाच्या मुलीचा वाढदिवस विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, केक व नाश्ता वाटून साजरा केला.
नागपूर जिल्हा परिषद प्रायमरी शाळा बनवाडी च्या मुख्याध्यापिका वनमाला गोतमारे, शिक्षक वामन सोमकुवर, बनवाडी चे मूलनिवासी व प्रसिद्द सामाजिक कार्यकर्ते उत्तम शेवडे, प्रा जगदीश गेडाम, किरण राऊत, सुनीता एसनसुरे, छोटेलाल फुलझेले, अशोक शेवडे यांच्या हस्ते, प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनात शालेय साहित्य वितरणाचा कार्यक्रम करण्यात आला.
याप्रसंगी अंकुश चव्हाण, तन्मय राऊत, प्रणय खडसे, सत्यम वडमे, ईशान वलके, ओम सलाम, कोहिनूर बोटरे, वेदासू राऊत, वेदांत झाडे, आराध्या उईके, आयशा कोसारे, सायली डडमल, पूर्वी झंझाड, परी सलाम, सार्थक एसनसुरे, स्वरा एसनसुरे, आस्था शेवडे आदी विद्यार्थी सहभागी झाले होते.