इंस्पेरेशन कप 2023, दुसरी राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न

नागपूर :- कराटे कोकुसाई इंडिपेंडेट फेडेरेशन इंडिया द्वारे इस्पेरेशन कप 2023 दुसरी राष्ट्रीय कराटे स्पर्धा जरीपटका येथील महात्मा गांधी शाळा येथे नुकतीच संपन्न झाली. सदर दोन दिवसीय कराटे स्पर्धेमध्ये मध्यप्रदेश, आसाम, कर्नाटक, आंध्रप्रदेश, हिमाचल प्रदेश, दिल्ली व महाराष्ट्रतील विविध जिल्ह्यातील 629 खेळाडूंनी सहभाग नोंदविला.

सदर दोन दिवसीय कराटे स्पर्धेचे उद्घाटन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर ग्रामीण (अतिरिक्त कार्यभार)विजय चव्हाण व समाज कल्याण विभाग, नागपूरच्या सहाय्यक आयुक्त  सुकेशिनी तेलगोटे यांच्या शुभ हस्ते झाले. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता, प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ह्या कार्यक्रमाला सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, नागपूर ग्रामीण चे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते, तर वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिनेश कोचे, कराटे कोकुसाई इंडिपेंडेंट फेडेरेशन इंडियाचे अध्यक्ष सेन्साई रविकांत मेश्राम, राष्ट्रीय सचिव सेन्साई अमित शेंडे उपस्थित होते.

स्पर्धेत चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन कुमिते, काता, अशा अनेक प्रकारात विजयी स्पर्धकानां रोख रक्कम, सम्मानचिन्ह, प्रमाणपत्र देवून सम्मानीत करण्यात आले. स्पर्धेत निर्णायक पंच व परीक्षक यामध्ये सेन्साई ऐश गौरखेडे, सेन्साई रोहित वंजारी, सेन्साई इरशाद अंसारी, सेन्साई आशिष घापेटे, सेन्साई विनय बोढे, सेन्साई खुशी वोरा, सेन्साई आशिष सहारे, सेन्साई अमन पांडे, सेन्साई जयेश दांडेकर, सेन्साई रजित मांझी यांनी जवाबदारी पार पाडली.

स्पर्धेचे बक्षिस वितरण कार्यक्रम पश्चिम नागपूरचे आमदार  विकास ठाकरे यांच्या हस्ते तसेच प्रविण पाटील (उत्तर नागपूर अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी), वरिष्ठ क्रीडा संघटक प्रविण मानवटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी  दिनेश कोचे, सेन्साई रविकांत मेश्राम, सेन्साई अमित शेंडे,  विक्रम बोरकर, सेन्साई श्रीकांत मेश्राम, श्याम पाटील, सिद्धार्थ मेश्राम मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन सेन्साई ऐश गौरखेडे यांनी केले तर आभार सेन्साई श्रीकांत मेश्राम यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी ब्रिजेश रामटेके, श्रद्धा, कामाकक्षी, वृषाली चव्हाण, काव्या शेंडे, माही ईशवरकर, सपना, सार्थक काळे यांनी परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

SELF-RELIANCE IN PRODUCTION OF DEFENCE PRODUCTS

Sat Feb 11 , 2023
New Delhi :-The Government has undertaken a number of policy initiatives for indigenous manufacturing of state-of-the-art technology defence products. These initiatives, inter-alia, include: In order to promote indigenous design and development of defence equipment ‘Buy {Indian-IDDM (Indigenously Designed, Developed and Manufactured)}’ category has been accorded top most priority for procurement of capital equipment. An innovation ecosystem for Defence titled Innovations […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com