माजी नगरसेवक कपिल गायधनेनी केले पक्ष्यासाठी जलपात्राची सोय

संदीप कांबळे, कामठी

– घरोघरी केले जलपात्र वितरण
कामठी ता प्र 28:- यंदाच्या उन्हाळ्यात उन्हाचे प्रमाण अधिक असून नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत आहे.अशा परिस्थितीत हाल सांगता येत नसलेल्या पशुपक्ष्यांचे काळजी घेत उन्हाळ्यात चारा पाण्या अभावी पशुपक्ष्यांचा मृत्यू होऊ नये यासाठी माजी नगरसेवक कपिल गायधने यांनी प्रभाग क्र 5 येथील हमालपुरा, जुनी ओली, कांटी ओली परिसरातील 500 च्या वर नागरिकांना घरोघरी विनामूल्य जलपात्र वितरण केले.या मानवतेच्या कार्याचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे तसेच आमदार टेकचंद सावरकर कडून कौतुक करण्यात आले.
उन्हाळ्याच्या दाहक उन्हात पशु पक्ष्याना पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नाही त्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे तसेच खायला अन्न मिळावे यासाठी दुपात्र असलेले जल व अन्न पात्र असलेले जलंअन्न पात्र घरोघरी वितरित करण्यात आले पक्ष्याना पिण्यास पाणी मिळावे व खायला अन्न मिळावे ,त्यांची उपासमार न व्हावी यासाठी प्रत्येकाने आपल्या घरासमोर , घराच्या भिंतीवर , छतावर ,कुठेही, वा योग्य त्या ठिकाणी पक्षी येऊन आपली तृष्णा शमवू शकतील अशा ठिकाणी हे जलअन्न पात्र ठेवावे असे आव्हान माजी नगरसेवक कपिल गायधने तसेच जनसेविका दिव्या कपिल गायधने यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

युवा मजदूर फाउंडेशन नागपुर की ओर से 1 मई 2022 को मजदूर महोत्सव

Thu Apr 28 , 2022
मजदूर महोत्सव कार्यक्रम का “ग्राउंड मे भूमि पूजन नागपुर – “एक शाम मजदूरों के नाम” कार्यक्रम का आज भूमि पूजन डॉक्टर संजय कुमार थटेरे,पंडित कन्हैया शास्त्री व खेमराज दमाहे, अध्यक्ष युवा मजदूर फाउंडेशन इनके हाथों ग्राउंड पर भूमि पूजन कार्यक्रम किया गया। कार्यक्रम का मकसद शहर में गगनचुंबी इमारतों में काम करने वाले मजदूरों का मनोरंजन उनको शासकीय योजना की माहिती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com